चार सराईतांच्या आवळल्या मुसक्या
USER

चार सराईतांच्या आवळल्या मुसक्या

चार गावठी पिस्तूल व आठ जिवंत काडतूसांसह घेतले ताब्यात

नाशिकरोड | प्रतिनिधी

जय भवानी रोड परिसरात असलेल्या फर्नांडिस वाडी या ठिकाणी उपनगर पोलिसांनी छापा टाकून चार सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे....

त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल व आठ जिवंत काडतूस तसेच एक फॉर्च्युनर कंपनीची चार चाकी महागडी गाडी जप्त केली आहे.

राहुल संदीप सोनवणे, सागर किसन कोकणे, दर्शन उत्तम दोंदे व प्रशांत जाधव असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

या चौघांकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आदीसह महागड्या कंपनीची चार चाकी गाडी असा सुमारे वीस लाख 92 हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात हवालदार राहुल पालखेडे यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी चौघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com