एमएचटी-सीईटीसाठी साडेचार लाख विद्यार्थी

नाशिकमधून 22 हजार प्रविष्ठ
एमएचटी-सीईटीसाठी साडेचार लाख विद्यार्थी

नाशिक । Nashik (भारत पगारे)

अभियांत्रिकी, फार्मसी आणि अ‍ॅग्रिकल्चर या पदवीस्तरावरील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येत असलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी राज्यातील साडेचार लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

यात नाशिक जिल्ह्यातून 22 हजार 607 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून पीसीएम, पीसीबी आणि या दोन्ही परीक्षांसीठी अर्ज करण्यात आले आहेत.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी कार्यरत आहे. अभियांत्रिकी, (बीई व बीटेक), फार्मसी (पदविका व पदवी फार्मसी), पदवीस्तरावरील कृषी अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेण्यात येत आहे.

करोना संकटामुळे सीईटी परीक्षा वेळोवेळी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर विद्यार्थ्यांनाही अर्ज करण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली होती.

या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक 21 सप्टेंबरला जाहीर करण्यात आले होते. परंतु महाविद्यालयांतील अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी येत होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेला बसता येत नव्हते.

विद्यार्थी व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाने सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक सेलकडून जाहीर करण्यात आले.

या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून एकूण 22 हजार 607 वद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.यातील पीसीएम ग्रुपसाठी 6822, पीसीबी ग्रुपसाठी 7972 आणि पीसीएम+पीसीबीसाठी 7813 अर्जांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, अहमदनगर जिल्ह्यातून एकूण 25 हजार 287, पुणे-40 हजार 661.

नागपूर-22 हजार 556, मुंबई-17 हजार 579 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. महाराष्ट्र राज्यातून पीसीएम ग्रुपसाठी 1 लाख 50 हजार 89, तर पीसीबीसाठी 1 लाख 92 हजार अर्ज नोंद झाले आहेत. तसेच पीसीएम+पीसीबीसाठी 89 हजार 846 असे एकूण 4 लाख 32 हजार 10 विद्यार्थी सीईटी देणार आहेत. याचे प्रमाण 99.25 टक्के इतके आहे.

सर्वात कमी म्हणजे केवळ एक अर्ज हा सिक्किम राज्यातून भरला गेला आहे, त्या खालोखाल मणिपूर, मेघालय येथून प्रत्येकी दोन, पुदुच्चेरी येथून 3 तसेच उत्तर प्रदेशातून 2470, बिहार येथून 2176, गोवा-136, मध्यप्रदेश-2874, आंध्रप्रदेश-175, दिल्ली एनसीआर 674 व उत्तराखंड येथून 124 अर्ज नोंद झाले आहेत.

परराज्यातून 20 हजार अर्ज

महाराष्ट्राबाहेरील राज्यांत राहणार्‍या एकूण 19 हजार 896 विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटीसाठी अर्ज केले आहेत. यातील पीसीएमसाठी 16 हजार 18 तर पीसीबीसाठी 3200 व पीसीएम+पीसीबीसाठी 678 अर्ज नोंद झाले आहेत.

प्रवर्गनिहाय अर्जांची संख्या

ईडब्लूएस-10, 979, एनटी-बी-10, 390,एनटी-सी-19, 844,एनटी-डी-10, 140,ओबीसी-1, 22, 771, खुला-1, 45, 784, एसबीसी-7005, एससी-50, 759, एसईबीसी-44, 041, एसटी-18, 446, व्हीजे/डीटी एनटी(ए)-11, 757

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com