सप्तशृंगी गडावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

सप्तशृंगी गडावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

सप्तशृंगी गड | वार्ताहर Saptshrungi Gadh

येथील मार्कंडेय पर्वतावर जाणार्‍या चिरखानी या पायवाटे जवळील खोल दरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह unknown person dead bodyआढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मृतदेहांची अवस्था अतिशय वाईट असल्याने शवविच्छेदन करून स्थानिक लोकांच्या मदतीने अंत्यविधी करण्यात आला ,मृत इसमाचे वय अंदाजे 45 ते 50 असुन अंगात भुरकट कलरचा स्वेटर काळ्या कलरची पँट परिधान केलेली आहे, या व्यक्तीबद्दल कुणाला काही माहिती असल्यास कळवण पोलीस Kalwan Police Station यांच्याशी संपर्क साधावा, पुढील तपास पोलिस निरीक्षक , समाधान नागरे व पोलिस कर्मचारी करीत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्ह्याच्या घटना पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे, अशातच अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने हा व्यक्ती नक्की कोन आहे, त्याचा मृतदेह कसा गेला,त्याचा खुन झाला की आत्महत्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे, पोलिस तपासानंतर या प्रकरणी नक्की काय खुलासा होतो महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com