चाळीस लाख विद्यार्थ्यांना लस देणार

व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर संवाद
चाळीस लाख विद्यार्थ्यांना लस देणार

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येत्या सोमवारपासून 40 लाख विद्यार्थ्यांचे Vaccination to Students तसेच शिक्षक Teachers आणि शिक्षकेतरांचे कोविड लसीकरणाचे नियोजन आहे. आत्ताच आपण योग्य काळजी घेतल्यास पुढील वर्षी मास्क घालण्याची वेळ येणार नाही. महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घ्यावी. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून चांगले उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत Higher and Technical Education Minister Uday Samant यांनी केले.

मंत्री सामंत यांनी नाशिकरोडच्या बिटकोसह निवडक महाविद्यालयांतील Bytco College प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद Communicate via video conference साधला. प्राचार्य डॉ. संजय तुपे, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ.विद्युल्लता हांडे, प्रा. निलेश महाजन, प्रा. गणेश दिलवाले, प्रा. विजय सुट्टे, डॉ. मीनाक्षी राठी, डॉ. के. सी. टकले, प्रा. कैलास बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी सामंत म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून करोनामुळे नियोजन विस्कळीत झालेले असून कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत आहे.

ऑनलाइन अभ्यासक्रमात विद्यार्थी व शिक्षकांची तारांबळ होत होती. परीक्षा आणि शिक्षण ऑनलाईन झाल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका कमी झाल्याने सरकारने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील शिक्षणाची गुणवत्ता देशात व जगात उंचवावी. प्राचार्य तुपे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा लसीचा डेटा गोळा करत असून पुढील आठवड्यात लसीकरण मोहीम राबवली जाईल. 40 टक्के विद्यार्थ्यांनी पहिला डोस तर 20 टक्के विद्यार्थ्यांनी दोन्ही लसीची मात्रा घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com