
सिन्नर | Sinnar
येथील एका तालुका कृषी अधिकाऱ्यास काल रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-corruption Department) पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.अशातच आता ही घटना ताजी असतानाच सिन्नर नगरपरिषदेच्या (Sinnar Municipal Council) माजी मुख्याधिकाऱ्यास एसीबीने लाच (Bribe) घेताना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय केदार असे नगरपरिषदेच्या माजी मुख्याधिकाऱ्याचे नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्याचे समजते. तक्रारदाराची बांधकाम मंजुरीची फाईल ६ महिन्यांपासून अडवून ठेवली होती. त्यापोटी पाच हजार रुपयांची मागणी संबधित अधिकाऱ्याने (officer) केली होती.
यासंदर्भात तीन ते चार दिवसांपासून मोबाईलवर सुरू असलेले संभाषण एसीबीने पुरावा म्हणून ग्राह्य धरत केदार यांना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ताब्यात (possession) घेतले. त्यासोबतच केदार यांच्या शिवाजीनगरमधील निवासस्थानाची तपासणी करण्यात येत आहे.