
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी
त्रंबकेश्वर पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष जयंत शिखरे (वय ६६) यांचे आज सांयकाळी सात वाजता निधन झाले.
पुरोहित संघाध्यक्ष असतांना कुंभमेळा कालावधीत त्रंबकेश्वर येथील धार्मिक व आध्यात्मिक परंपरा अव्याहत रहावी यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.
साधु महंत व शासन यातील दुवा म्हणून काम केले होते. त्रंबकेश्वर देवस्थान चे विश्वस्त म्हणून देखील त्यांनी काम उत्तम रित्या पार पाडले होते.मागील वर्षी जव्हार रस्त्यावर त्यांना अपघात झाल्यापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी जावई, नातवंडे असा परिवार आहे. पुरोहित संघ त्रंबकेश्वर, येथील धार्मिक व राजकीय संघटनांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.