Nashik News : योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट

Nashik News : योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट

नाशिकरोड | प्रतिनिधी |Nashik Road

देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते योगेश घोलप (Yogesh Gholap) यांनी आज मुंबई (Mumbai) येथे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच ही केवळ सदिच्छा भेट होती अशी माहिती योगेश घोलप यांनी दिली....

Nashik News : योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट
PM Narendra Modi Birthday : लहानपणीचे कष्टाळू, गुजरातचे मुख्यमंत्री ते जगातील प्रभावशाली नेते पंतप्रधान मोदी

गेल्या आठ दिवसांपासून शिवसेना उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा (Resignation) दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. घोलप यांचा राजीनामा ठाकरे गटाच्या (Thackeray Group) पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला नसला तरी त्यांना वेट अँड वॉच ठेवले आहे. तसेच त्यांना चर्चेसाठी मातोश्रीवरून अद्यापही निरोप अथवा फोन आला नसल्यामुळे घोलप यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून स्वतः घोलप सुद्धा याबाबत नाराज आहे. मात्र, घोलप हे ठाकरे गटातच राहणार असल्याचे समजते. घोलप यांच्या समर्थनार्थ आज रविवार (दि.१७ सप्टेंबर) रोजी छत्रपती शिवाजी पार्क मुंबई दादर येथे चर्मकार समाजाच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

Nashik News : योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट
Plane Crash News : पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; पायलटसह १४ प्रवाशांचा मृत्यू

तर दुसरीकडे बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांनी मुंबई येथे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यासंदर्भात योगेश घोलप यांच्याशी संपर्क साधला असता शरद पवार हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असून ठाकरे गट महाविकास आघाडी गटाचा एक घटक आहे. त्यामुळे आपण त्यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद (Blessing) घेतले असे घोलप यांनी सांगितले.

Nashik News : योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट
Asia Cup 2023 Final : श्रीलंकेने टॉस जिंकला; प्रथम फंलदाजीचा निर्णय, भारतीय संघात मोठा बदल

दरम्यान, याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, दिनेश धात्रक, उमेश खातळे, मनोज पालखेडे, शिवसेना ठाकरे गटाचे नितीन चिडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik News : योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट
Accident News : पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; तीन ठार, चार जण गंभीर जखमी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com