माजी आमदार मेंगाळ समर्थकांसह शिंदे गटात

माजी आमदार मेंगाळ समर्थकांसह शिंदे गटात

घोटी । वार्ताहर Ghoti

खासदार हेमंत गोडसे ( MP Hemant Godse ) शिंदे गटात गेल्यानंतर इगतपुरी तालुक्यातून ( Igatpuri Taluka )शिवसेनेला दुसरा धक्का बसला आहे. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ त्यांच्या समर्थकांसह शिंदे( CM Eknath Shinde Group) गटात दाखल (Former MLA Kashinath Mengal)झाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटात जाण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते उत्सुक आहेत. काल रात्री उशिरा माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह शिवसेनेचे जयंत साठे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते रघुनाथ तोकडे, घोटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय आरोटे, खंडेराव धांडे, संदीप शिरसाठ, जयराम गव्हाणे यांच्यासह शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समर्थन दर्शवले.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकताच जिल्हा दौरा केला होता. त्यावेळी घोटी टोलनाक्यावर माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. मात्र यावेळी काशिनाथ मेंगाळ उपस्थित नव्हते. मात्र त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. मेंगाळ हजर नसल्याने ते शिंदे गटात दाखल होतील, अशा चर्चांना त्यावेळी उधाण आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com