माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांचे मविआ सरकारवर टीकास्त्र

माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांचे मविआ सरकारवर टीकास्त्र

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्रातील अनेक मंत्री फरार आहेत. काही तुरूंगात गेले. पोलिस अधिकार्‍यांना वसुलीचे टार्गेट देण्यात आले असल्याने राज्य वार्‍यावर आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही, सरकार कोण चालवतं हेही समजत नाही. महाराष्ट्रातील सरकार टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रा. प्रकाश जावडेकर (BJP senior leader, former Minister. Prakash Javadekar ) यांनी केली.

येथील परशुराम सायखेडकर सभागृहात माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने ( On the occasion of the Jayanti of former Prime Minister Atal Bihari Vajpayee )झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सिमा हिरे, ज्येष्ठ नेते विजय साने, पक्षाचे सरचिटणीस पवन भगूरकर, जगन्नाथ पाटील, अविनाश पाटील, सुनील केदार उपस्थित होते.

प्रा. जावडेकर पुढे म्हणाले की, दररोज पंधरा कोटी तर दर महिन्याला साडेचारशे कोटी व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी भाजपाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोफत देण्यामध्ये भारत हा जगातील अव्वल देश असून कोविड काळात भाजप अग्रभागी राहून संघर्ष करीत होता. प्रा. जावडेकर पुढे म्हणाले की, मोफत लस, धान्य, गॅस सिलेंडर, ऑक्सिजन, अन्न या बाबतीत भाजपाने घरोघरी सेवा केली. जिल्ह्यात मोठमोठी ऑक्सीजन प्लांट उभारली.

या सर्वांना सुशासन म्हणतात. आजपर्यंत 140 कोटी लोकांना मोफत करोना लस दिली. कोरोनाच्या लढाईत भाजपचा विजय झाला. जेनेरिक औषधांमुळे औषधे स्वस्त झाली. डिजिटल क्रांतीमुळे सेवा आपल्या दारात आल्या. महाराष्ट्रात तर पोलिसच खून करतात. अंबानीच्या बंगल्याबाहेर बॉम्ब ठेवतात. त्यामुळे सध्या देशभर अटलजींना अभिप्रेत असलेले सुशासन केंद्रातले मोदी सरकार राबवत आहे, असेही त्यांनी सांगितले. लक्ष्मण सावजींनीही मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन सुनील केदार यांनी केले. यावेळी अरुण पवार, राजाभाऊ मोगल, दिनकर आढाव, शरद मोरे, राकेश दोंदे, प्रतिर्भा पवार, छार्या देवांग, शाम बडोदे, यशवंत निकुळे, सुप्रिया खोडे, महेश हिरे, माधुरी पालवे, मनीष बागुल, सतीश कोठारी, अलका जांभेकर, डॉ. बसंतीलाल गुजराती, हिमगौरी आडके, नीलेश महाजन, अजिंक्य साने, सचिन हांडगे, संध्या कुलकर्णी, देवदत्त जोशी, अविनाश पाटील, श्याम पिंपरकर, योगेश भगत, भास्कर बोडेकर, प्रभाकर येवले, ज्ञानेश्वर काकड, शिवाजी बर्के, रामहरी संभेराव आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com