माजी जिल्हाधिकारी मांढरेंच्या कार्याचा होणार गौरव; 'हे' आहे कारण

माजी जिल्हाधिकारी मांढरेंच्या कार्याचा होणार गौरव; 'हे' आहे कारण

नाशिक । Nashik

'माझी वसुंधरा अभियान' (Majhi Vasundhara Abhiyan) अंतर्गत निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये जिल्ह्याचीही कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांना पर्यावरण दिनाच्या (Environment Day) कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती 'माझी वसुंधरा अभियाना'मार्फत देण्यात आली आहे...

'माझी वसुंधरा अभियाना'मार्फत याबाबत तत्कालीन जिल्हाधिकरी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांना पत्रान्वये कळविल्यानुसार, माझी वसुंधरा अभियानांतर्गत (Majhi Vasundhara Abhiyan) घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा रविवार ५ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता टाटा थिएटर, एन.सी.पी.ए., नरीमन पाईट, मुंबई ४०००२१ येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी https://www.facebook.com/majhivasundhara हे फेसबुक पेज आणि http://bit.do/ncpatheartre ही गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारीत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी केलेल्या सर्वोत्तम कामगिरी बद्दल सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सन्मान सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CMUddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com