हरसूल : माजी उपसरपंच सुरेंद्र देवरगावकर यांचे निधन

हरसूल : माजी उपसरपंच सुरेंद्र देवरगावकर यांचे निधन

हरसूल | Harsul

हरसूल ता. त्र्यंबकेश्वर येथील प्रतिष्ठित व्यापारी,नाशिक जिल्हा तेलीक समाजाचे उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचयत हरसूल उपसरपंच सुरेंद्र सदाशिव देवरगावकर यांचे दुःखद निधन झाले.

हरसूल येथील बाजारपेठ उभारणी साठी मोठे योगदान आहे.

हरसूल सारख्या आदिवासी भागात 80 च्या दशकात पहिले मेडिकल स्टोअर स्थापन करून ग्रामस्थांची गैरसोय थांबण्यात त्यांना यश आले.

हरसूल ला भाताचे व भुईमूग साठी व्यापारी केंद्र करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. त्याचे मृत्यू समयी 60 वर्षाचे होते.त्याच्या निधनाबद्दल हरसूल सह परिसरात अनेक गावांत शोक व्यक्त करण्यात आले.

त्याच्या निधनाबद्दल नाशिक जिल्हा तैलिक समाज,हरसूल येथील व्यापारी संघटना, सामाजिक राजकीय क्षेत्राची हानी झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com