शेतकर्‍यांचे वीजबिल माफ करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांची मागणी
शेतकर्‍यांचे वीजबिल माफ करा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील अनेक गावांमध्ये कमी-जास्त पाऊस (Rain) झाल्याने शेतीमालाचे (Agricultural goods) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच कांद्यांसह (Onion) इतर पिकांना चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी (Farmers) आर्थिक संकटात (Financial crisis) सापडला असतांनाच वीज बिल (Electricity bill) वसुलीसाठी पठानी तगादा लावत वीज कनेक्शन (Power connection) तोडले जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

राज्य शासनाने (Sate Government) पंजाबच्या (Punjab) धर्तीवर शेतकर्‍यांना वीज बिल व पाणीपट्टी माफ करावी (Excuse the electricity bill and water bill), अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार (Provincial member of NCP Dr. Jayant Pawar) यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार (Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar) यांना डॉ. पवार यांनी निवेदन पाठवून शेतकर्‍यांचे वीजबिल व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी करत तालुक्यातील शेतकर्‍यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाकडे लक्ष वेधले आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जून महिन्यात चांगला पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील अनेक भागात दुबार पेरणी करण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक सामना करावा लागला. त्यानंतर तालुक्यात झालेल्या कमी-अधिक पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नगदी पीक असलेल्या कांद्यासह इतर पिकांना व भाजीपाला यांना कमी भाव मिळत आहे व डाळिंब पिकावर तेल्या रोगाचे आक्रमण वाढत असल्याने शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक अडचणीत सापडला आहे.

यातच सध्या वीज वितरण कंपनीकडून विजबिल वसुलीसाठी पठाणी पद्धत वापरली जात असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. विज बिल भरत नसल्याने शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. हा शेतकर्‍यांवर अन्याय केला जात आहे. यास्तव राज्य शासनाने पंजाब सरकारच्या धर्तीवर शेतकर्‍यांना वीज बिल माफीसह पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी डॉ. जयंत पवार यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com