स्थायी सभेत नगरसेवकांना मास्कचा विसर

स्थायी सभेत नगरसेवकांना मास्कचा विसर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या (corona) संभाव्य तिसर्‍या लाटेच्या व ओमायक्रोन (Omycron) या नव्या व्हेरिअंटच्या (New variant) पार्श्वभूमीवर महापालिकेने मास्क (Mask) न वापणार्‍यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. मागच्या महिन्यात महापालिका मुख्यालय (Municipal headquarters) राजीव गांधी भवनातच (Rajiv Gandhi Bhavan) प्रशासनाने कारवाई करून मुख्यालयात मास्क परिधान न करणार्‍या 11 सेवक व नागरिकांवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची कारवाई केली होती.

शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी (Officer), कर्मचारी (Staff) व नागरिक यांनी यांना मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव (Commissioner Kailas Jadhav) यांनी अतिरिक्त आयुक्त (शहर) सुरेश खाडे (Additional Commissioner (City) Suresh Khade) यांना याबाबत निर्देशही दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने खाडे यांनी 9 नोव्हेंबरला मनपा मुख्यालयाच्या इमारतीतील सर्व मजल्यांवरील विभागांमध्ये व परिसरात अचानक भेटी देऊन पाहणी केली होती. शासन निर्देशानुसार विविध विभागातील तसेच मनपा मुख्यालयात कामानिमित्त आलेले नागरिक असे एकूण 11 जणांनी मास्क परिधान केले नसल्याचे आढळून आले होते. या सर्वांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आले होते.

मनपातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच मनपाच्या सर्व कार्यालयांमध्ये कामा निमित्त येणारे नागरिकांनी करोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करून कार्यालयात मास्क परिधान करावे, असे आवाहनही करण्यात येत आहेत. मात्र आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत (Standing Committee Meeting) अनेक नगरसेवक विना मास्क बसले होते,

विशेष म्हणजे त्यांच्यासमोर अतिरिक्त आयुक्तांसह महापालिका प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते. तरीही कोणत्याही प्रकारे मासक लावण्याच्या सूचना देखील करण्यात आले नाही तर कारवाईचा प्रकारच दूर राहिला. यामुळे सामान्य नागरिकांना व मनपा सेवकांना वेगळा न्याय व नगरसेवक यांना वेगळा न्याय का अशी चर्चा सुरू होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com