टोल नाक्यावरील 'त्या' चर्चेचा प्रशासनास विसर

टोल नाक्यावरील 'त्या' चर्चेचा प्रशासनास विसर

पेठ | Peth

तालुक्यातील नाशिक - पेठ - धरमपुर (Nashik-Peth-Dharampur) या राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र. ८४८ वर चाचडगाव नजीक टोलनाका (Chachadgaon Toll Plaza) असून याठिकाणी पेठ तालुका (Peth Taluka) वासीयांकडून होणाऱ्या टोल वसुलीच्या विरोधात काल सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले होते.

मात्र, आंदोलन (Agitation) मागे घेऊन १२ तास होत नाही तोवरच या भागातील सावळघाटात (Savalghat) निसरड्या व उंचवटे निर्माण झालेल्या रस्त्यावरुन (Road) मालवाहू ट्रकचा मागील भाग रस्त्यालगत रूतून बसल्याने वाहतुक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

याशिवाय क्षितीग्रस्त झाल्यास क्रेनच्या व्यवस्थेस अग्रक्रम देण्याचे अश्वासन प्रशासन विसरल्याचे वास्तव समोर आले असून या वाहनास पून्हा मार्गस्थ होण्यासाठीची क्रेन अद्यापही प्राप्त झालेली नाही. यामध्ये तातडीने सुधारणा होईल की पुन्हा जन आंदोलनाचे अस्त्र वापरावे लागेल हे सर्व प्रशासनाच्या मानसीकतेवर अवलंबून असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, रस्त्याच्या कामांसोबतच धोकादायक वळणे, साइडपट्टे आणि घाटातील कामे बाकी असतांना नाशिक - पेठ - धरमपुर या महामार्गावर टोल वसुलीचे मायाजाल सुरु आहे. या टोल नाक्यावर भाराभर समस्या असतानाही स्थानिकांना देखील टोलमुक्ती मिळत नसल्याने या उद्रेकातून काल पेठ तालुक्यातील सर्वपक्षीय लोक प्रतिनिधींनी रास्ता रोको करत हे सर्व प्रश्न प्रशासनासमोर मांडून जाब विचारला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com