थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई: आयुक्त

थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई: आयुक्त

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

मालमत्ता (property), पाणीपट्टी (water tax) तसेच संकीर्ण कराची थकबाकी (Tax arrears) असलेल्यांनी संपूर्ण रक्कम भरल्यास व्याजामध्ये शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे.

12 नोव्हेंबरपर्यंतच्या या मुदतीत थकबाकी (arrears) न भरणार्‍यांवर जप्तीसह नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई मनपा प्रशासनातर्फे केली जाईल, असा इशारा आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi) यांनी आहे.

पाणीपट्टी (water tax), संकीर्ण कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर (development works) होत आहे. या पार्श्वभूमीवर थकित करवसुलीसाठी मनपा प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. येथील न्यायालयात येत्या 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत (National People's Court) आयोजित करण्यात आली आहे.

या लोकअदालतीत किंवा तत्पूर्वी आपल्या प्रभाग समिती कार्यालयात थकबाकी असलेल्यांनी मालमत्ता व पाणीपट्टी एकरकमी भरणा केल्यास संबंधित थकबाकीदारांना व्याजात शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

याच पद्धतीने संकीर्ण कराची थकबाकी (Tax arrears) पूर्णपणे भरणार्‍यांनादेखील व्याजदरात शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे. या कराची थकबाकी मनपा मुख्य कार्यालयातील संकीर्ण कर विभागात जमा करायची आहे. न्यायालयात 12 नोव्हेंबर रोजी आयोजित लोकअदालतमध्ये नागरिकांना आपली प्रकरणे, व तडजोडीने मिटवून व्याजदरातील सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

सदरची सवलत ही 12 नोव्हेंबरपर्यंत असल्याने या संधीचा थकबाकीदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करत आयुक्त गोसावी यांनी थकबाकी न भरणार्‍यांविरुद्ध जप्तीसह नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे. यासाठी होणारा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com