खडकाळ जमिनीवर बहरली वनराई; महिला बचतगटाची राज्य शासनाकडून दखल

खडकाळ जमिनीवर बहरली वनराई; महिला बचतगटाची राज्य शासनाकडून दखल

सिन्नर । अमोल निरगुडे | Sinnar

सिन्नर नगर परिषदेच्या (sinnar nagar parishad) कानडी मळा भागातील मैला व्यवस्थापन केंद्रातील (Waste Management Center) खडकाळ जमिनीवर महिला बचत गटाच्या (Women's self-help group) माध्यमातून वनराई (Forestry) फुलली असून येथे तयार झालेले सुंदर उद्यान सर्वांच्याच मनात घर करत आहे.

यामुळे बचत गटाच्या 6 महिलांना हक्काचा रोजगार (Employment) उपलब्ध झाला असून या सुंदर मॉडेलची राज्य शासनाकडूनही (state government) दखल घेण्यात आली आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षांपासून महिला बचत गटाचे जाळे निर्माण झाले असून विविध योजनांच्या माध्यमातून या महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. स्वयंरोजगारासाठी नगरपरिषदेकडून 10 हजारांच्या निधीसह (fund) बँकांच्या माध्यमातून अल्प व्याजदरावर कर्जही उपलब्ध होत असल्याने या महिला आपल्या पायावर सक्षमपणे उभ्या राहत आहेत.

त्यातील एक बचत गट म्हणजे गोंदेश्वर महादेव मंदिराजवळील गौतमनगर भागातील केशवा बचत गट आहे. या बचतगटातील 6 महिलांनी पुर्ण शहराचा मैला जमा होणार्‍या ठिकाणी काम करत तेथील प्रकल्पाला विलोभनीय सौंदर्य प्राप्त करुन दिले आहे. 5 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या बचत गटातील महिला आज सक्षमपणे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

नगर परिषदेच्या (nagar parishad) माध्यमातूनही त्यांना हवी ती साथ मिळत असल्याने येथील मैला व्यवस्थापन केंद्राला (Waste Management Center) राज्य मॉडेल बनवत आपल्या कार्याची छाप त्यांनी सोडली आहे. दोन वर्षांपूर्वी नगरपरिषदेने मैला व्यवस्थापन केंद्राच्या ठिकाणी बागेच्या निर्मितीसाठी व देखभालीसाठी मासिक 35 हजार रुपयांचे टेंडर (tender) काढले होते. मात्र, कुठल्याही राजकीय व्यक्तीला हे टेंडर न देण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला होता.

यासाठी बचत गटातील महिलांना हे टेंडर घेण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत केशवा बचत गटाच्या महिलांनी पुढे येत हे आव्हान स्विकारले. खडकाळ जमिनीवर बाग कशी फुलणार अशी शंका सुरुवातीला या महिलांच्या मनात आली. मात्र, मागे न हटता त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत दरारोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत येथे परिश्रम घेण्यास सुरुवात केली.

बघता बघता काही दिवसांतच येथील खडकाळ जमिनीवर वनराई फुलू लागली आणि महिलांच्या मनातील शंकाही दूर झाली. यानंतर नगरपरिषदेच्या मागदर्शनाखाली महिलांनी या ठिकाणी सुंदर बगीचा तयार करण्यास सुरुवात करत खडकाळ जमिनीवर वनराई फुलवण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. आज येथील बगीच्यात वेगवेगळ्या जातीची फुले, फळांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.

सिन्नरकरांचा मैला ज्या ठिकाणी जमा होतो त्याठिकाणी आज महिलांनी सर्वत्र सुगंध दरवळवला आहे. यासाठी महिलांना मुख्याधिकारी संजय केंदार व शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, आरोग्य विभागाचे निरीक्षक रवींद्र देशमुख व सेफ्ट युनिव्ंहर्सिटिचेे मार्गदर्शन लाभले.

8 हजार चौरस मीटरचे ‘ग्रीन लँड’

मैला व्यवस्थापन केंद्र उभारण्यासाठी नगर परिषदेने कानडी मळा परिसरातील खडकाळ जमिनीची निवड केली होती. बचत गटाच्या महिलांना येथे वनराई फुलवण्याचे आव्हान महिलांना मिळाले होते. मात्र, महिलांनी हे आव्हान पेलत येथील 8 हजार चौरस मीटर क्षेत्रावर दोन वर्षात ‘ग्रीन लँड’ तयार केले आहे. मैला व्यवस्थापन केंद्रातील 2 मिलियन लिटन पाण्याचा यासाठी पुर्नवापर होत आहे. त्यात आज 16 प्रकारचे 1400 वृक्षलागवड करण्यात आली आहे तर शेकडो प्रकारच्या फुलांची बागही येथे निर्माण झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com