वनराई बंधार्‍यांची होणार निर्मिती; तालुका कृषी विभागाने घेतला पुढाकार

वनराई बंधार्‍यांची होणार निर्मिती; तालुका कृषी विभागाने घेतला पुढाकार

हरसुल । वार्ताहर | Harsul

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), पेठ (peth), सुरगाणा (surgana) तसेच दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) ‘आपला गाव, आपला वनराई बंधारा’ या उपक्रमाद्वारे वाहून जाणारे पाणी रिकाम्या गोण्यात माती टाकून अडविण्यात येत आहे.

या उपक्रमात ग्रामपंचायत (gram panchayat), आर्ट ऑफ लिव्हिंगसह (Art of Living), शिक्षक (teachers), विद्यार्थी (students) तसेच तालुका कृषी विभागाने (Taluka Agriculture Department) मोठा पुढाकार घेत हरसूल परिसरात एकाच आठवड्यात एकवीसहुन अधिक वनराई बंधार्‍यांची निर्मिती केली आहे. यामुळे भूजल पातळीत मोठी वाढ होत असून अनेक ठिकाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

हरसूलसह परिसरात जलमित्र पोपट महाले यांच्या ग्रामस्थांच्या श्रमदानातून होणार्‍या आपला गाव आपला वनराई बंधारा (Vanrai Dam) उपक्रमात अनेक विभागांनी मोठा पुढाकार घेतला आहे. हरसूलसह (harsul) परिसरात एकाच आठवड्यात एकवीसहुन अधिक वनराई बंधार्‍यांची निर्मिती केली आहे. त्यात तांदळाची बारी, चिंचवड, बेरवळ (हट्टीपाडा), खरवळ, करंजपाडा, खरपडी, आमलोण, कुळवंडी, सारस्ते, ठाणापाडा आदी गावांचा समावेश आहे.

रिकाम्या गोण्यात माती टाकून वाहून जाणारे पाणी अडविण्यात येते. ग्रामपंचायत, पेठ तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार, त्र्यंबकेश्वरचे संदीप वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी विभागाचे कर्मचारी काम करीत आहेत.

या श्रमदानप्रसंगी सुरेश गायकवाड, अनिल बोरसे, सरपंच परशराम मोंढे, पोलीस पाटील दिनकर चौधरी, स्वप्नील माळेकर,नंदा चौधरी, पारिबाई भोये, रंजना चौधरी, मोनाली माळेकर,कृषी पर्यवेक्षक वसंत मराठे, व्ही. के. पवार, कृषी सहाय्यक भगवान चौधरी, तुषार गवळी, एम. एम.देशमुख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

वनराई बंधार्‍यांमुळे अनेक शेतकर्‍यांना मोठा फायदा होत आहे.रब्बी पिके तसेच भूजल पातळीत मोठी वाढ होत आहे.अनुक्रमे भूजल पातळीतील वाढ पाणीटंचाईच्या काही दिवसांसाठी मात करणारी आहे

- अविनाश खैरणार, तालुका कृषी अधिकारी पेठ

कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक यांना शेतकर्‍यांना मार्गदर्शनाबरोबरच जलसंधारण आणि संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे सूचित केले आहे.वनराई बंधारा मोहीम उपयुक्त असल्याने कृषी विभाग सक्रिय होत पुढाकार घेत आहे.

- संदीप वळवी, तालुका कृषी अधिकारी, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात एक ग्रामपंचायत एक वनराई बंधारा ग्रामसेवकांच्या माध्यमातून बांधणार आहे.हलगर्जीपणा करणार्‍या ग्रामसेवकावर कारवाई केली जाणार असून विशेष दखल घेतली जाणार आहे. या उपक्रमाला अधिक बळकटी देणार आहे.

- एस. एल. खताळे, गटविकास अधिकारी, त्र्यंबकेश्वर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com