देवगाव शिवारात आग; वनसंपत्ती जळून खाक

देवगाव शिवारात आग; वनसंपत्ती जळून खाक

पेठ । Peth

तालुक्यातील देवगांव (Devgaon) शिवारात अज्ञात इसमाकडून लागलेल्या वणव्यात (forest fire) वनविभागाच्या (forest) क्षेत्रातील तसेच लगतच्या मनोहर काशिनाथ इम्पाळ (Manohar Kashinath Impal) या शेतकऱ्याची (farmer) २ वर्षापूर्वी लागवड केलेली २५० पेक्षा जास्त आंब्याच्या झाडे (mango trees) जळून (Burn) खाक झाल्याने आर्थिक नुकसानीबरोबरच पर्यावरणाचीही (Environment) न भरूण येणारी हानी झाली आहे...

सध्या खरीपाचे पीक घेण्यासाठी शेतीच्या (agriculture) कामाची लगबग सुरु असल्याने रोप वाढीसाठी राब लावण्याचीही जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच उन्हाचा तडाखाही अत्यंत तीव्र असल्याने या ठिकाणी अज्ञात कारणामुळे लागलेल्या वणव्यात संबंधित शेतकऱ्याचे आर्थिक नुकसानाबरोबरच (financial losses) पर्यावरणाचीही हानी झाली आहे .

तसेच जळीत आंबा बागेच्या (Mango orchard) नुकसानीचा पंचनामा येथील तलाठी फोकणे यांनी तहसिलदारांना सादर केला आहे. मात्र वनविभागाची किती झाडे या वणव्यात जळून गेली व इतर वृक्षांची (trees) किती हानी झाली याबाबतची माहीती यंत्रणेकडे उपलब्ध नाही .

दरम्यान, पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक (Forest ranger) यांचा दौरा सुरु असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. तसेच दरवर्षी वनव्यामुळे होणारी वृक्षांच्या हानीची अद्यायावत माहिती यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याने सातत्याने निसर्गाच्या ऱ्हासाची होणारी जबाबदारी कुणावर हा प्रश्नही अधांतरीच राहीला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com