वनअधिकार्‍यांचे वणव्यांकडे दुर्लक्ष; पर्यटनमंत्र्र्‍यांकडे सेवाभावी संस्थेची तक्रार

वनअधिकार्‍यांचे वणव्यांकडे दुर्लक्ष; पर्यटनमंत्र्र्‍यांकडे सेवाभावी संस्थेची तक्रार

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

नाशिक जिल्ह्यातील (nashik district) वाढत्या वनव्याच्या (forest fire) घटना बघता यावर टास्क फोर्सच्या लघुगटाच्या अहवाल देऊन सहा महिने झाले. तसेच स्थानिक वन, पर्यावरण खात्याला (Forest, Environment Department) पत्र देऊन वणवा थांबवण्यासाठी वारंवार उपाय सुचवूनही कार्यवाही होत नाही

याकडे लक्ष वेधण्यासाठी आता शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था (Sivakarya Gadkot Conservation Society), वृक्षवल्ली फाउंडेशन (Vrikshavalli Foundation), दरी आईमाता वृक्षमित्र (Dari Aimata Vrikshmitra) यांच्यावतीने राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांच्यासह नाशिकचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे (Nitin Gudge, Regional Chief Conservator of Forests, Nashik), जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Collector Gangatharan D.), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Zilla Parishad Chief Executive Officer Lina Bansod) यांना निवेदन (memorandum) देण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात ब्रम्हगिरी (Brahmagiri), संतोषा (satosha), रामशेज (ramshej), मायना (mayna), मोरधन (mordhan), गवळवाडी परिसर, दरीआई माता पर्यावरण, सुळा डोंगर, मातोरी गायरान, नाशिकरोड प्रेस परिसर आदी ठिकाणी वणवा लागल्याने अपरिमित नैसर्गिक जैवविविधतेचे नुकसान झाले आहे. दुर्मिळ वनसंपदा, वन्यप्राणी, पक्षी, वनौषधी, जनावरांचा चारा, सरपटणारे प्राणी, पक्षांची घरटी, पिले नष्ट झाली. जंगलातील बिबट्यासह माकडे व अन्य वन्यजीव सैरवैर झाले. यांची चिंता वणवा लागल्याची खबर मिळताच हातातली कामे सोडून वणवा विझवणार्‍या हातांना अधिक आहे.

मात्र नाशिकचे वन, पर्यावरण विभाग, जिल्हा परिषद (zilha parishad), ग्रामपंचायतीत फलकावर असलेल्या वन व्यवस्थापन समित्या (Forest Management Committees) यांचे वनव्या बाबत अजूनही गांभीर्य नसल्याचे एकूण चित्र आहे. याकामी जिल्हा पोलीस प्रशासन संबंधित विभागाना पत्र दिले असून गाव पातळीवरील जैवविविधतेचे कागदोपत्री सर्वेक्षण करणारे जिल्हापरिषद, वणवा लागल्यावर तेथील नुकसानीचे ऑडिट व अहवाल बनवण्यात कसूर करणारे स्थानिक ग्रामपंचायती, वन,पर्यावरण खाते, व पर्यावरण संवर्धन, संरक्षण, वणवा रोखण्यात कुठं ही न-दिसणार्‍या वन व्यवस्थापण समित्यांना मात्र याबाबत अजूनही गांभीर्य नसल्याने जिल्हाधिकारी यांनी तातडीने बैठक लावून वणवा मुक्तीसाठी जागृती, प्रशिक्षण उपाय, जाळपट्टे उभारणी, वन संरक्षण, वणवा लावणार्‍यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

दरम्यान दि.26 मे रोजी सायंकाळी गवळवाडी भागात वणवा विझवला मात्र पहाटे दीड वाजता दरीमाता शेकडो एकरवरील पर्यावरण क्षेत्रात वणवा लागला 500 हुन अधिक झाडे यात खाक झाली. संबंधित ग्रामपंचायती व पर्यावरण वन, जिल्हा परिषद याकडून वनव्या बाबत दुर्लक्ष झाले तर होणार्‍या नैसर्गिक नुकसानीला, येणार्‍या आपत्तीला, हवामानात होणार्‍या बदल, गारपीट, अवकाळी, वादळं, हवेत कमी होणारा प्राणवायू, नष्ट होणार वन्यजीव याला जबाबदार कोण? हा सवाल ही जीव धोक्यात टाकून सातत्याने वणवा विझवणारया नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, वृक्षवल्ली फाउंडेशन, दरीआईमाता वृक्षमित्र यांनी केला आहे.

असेच होत राहिले तर समाज,प्रशासन व सरकारचे डोळे उघडण्यासाठी लवकरच दरीआईमाता भागात आम्ही आत्मक्लेश आंदोलन करू असा इशारा ही देण्यात आला आहे. यावेळी शिवकार्य गडकोटचे संस्थापक राम खुर्दळ, वृक्षवल्लीचे तुषार पिंगळे, दरीआईमाता वृक्षमित्र व पर्यटन विकासाचे भारत पिंगळे, शिवाजी भाऊ धोंडगे, पत्रकार जितेंद्र साठे, प्रदीप पिंगळे आदी उपस्थित होते.

जल, जमीन, जंगल, वन्यजीव, पक्षी एकूणच जीवविविधता जीवांचा श्वास आहे. मात्र त्यालाच सुरुंग लावण्याचा प्रकार घडत आहे. याला कारणीभूत सरकार, यंत्रणा व बधिर झालेला समाज आहे. नैसर्गिक संसाधने असलेल्या डोंगर, टेकड्यांचे अपरिमित उत्खनन, सातत्याने विकृतांनी लावलेले वाढलेले वणवे यात मात्र कधी भरून येणार नाही इतके नुकसान होणार आहे.परिणामी आपणच आपल्याला नाशाकडे, नैसर्गिक आपत्ती, हवामानातील अनिष्ट बदल याकडे घेऊन चाललो. ओरड करून होणार नाही यासाठी स्वतः होऊन या बाबतीत गंभीर व्हावं लागेल, याचीच परिणीती कोरोनात ऑक्सिजन लाखो मोजूनही मिळत नसायचा तर वाढती उष्णता, वर्षभर पडणारा अवकाळी,वादळ हे त्याचेच परिणाम आहे हे आपल्याला न समजन इतके तरी आपण गप्प होऊ नये.

- राम खुर्दळ, संस्थापक - शिवकार्य गडकोट संवर्धन, संस्था

वणवा लागताच शिवाजी धोंडगे, राम खुर्दळ, जितेंद्र साठे, तुषार पिंगळे, सागर शेलार, आशिष प्रजापती यांसह वृषवल्लीची टीम, काही ग्रामस्थ आम्ही वणवा विझवण्यासाठी धावून जातो व जीव धोक्यात टाकून ओल्या पोत्याने वणवा विझवतो. वणवे लावणारे मोकाट असून वणवे थांबवण्यासाठी आम्ही कित्येक पत्र दिले साधे प्रशासकीय आधिकारी भेटत नाही. उडवाउडवीची उत्तरे देतात. आम्ही वणवामुक्तीसाठी जागृती करू मात्र जिल्हाधिकारी यांनी वन, जिल्हापरिषद, पंचायत समित्या, वन पर्यावरण विभाग व वणवा विझवणारी मंडळी यांची एकत्रित बैठक घ्यावी. वणवा मुक्तीसाठी ठोस उपाय करून वनांना संरक्षणसाठी स्थानिक वन व्यवस्थापन समित्यांना जबाबदारी देता येईल. वणवा विझवण्याचे प्रशिक्षण आम्ही देऊ,मात्र पत्र देऊनही उत्तर मिळत नाही हेच दुर्दैव.

- भारत पिंगळे, शिवकार्य गडकोट संवर्धन,संस्था

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com