५० हजारांची लाच घेताना फॉरेस्ट अधिकारी अटकेत

परिमंडल अधिकाऱ्यासह एका महिलेचा समावेश
५० हजारांची लाच घेताना फॉरेस्ट अधिकारी अटकेत
न्यूज अपडेट

चिंचखेड | Chinchkhed

वनक्षेत्रातून पाण्याची पाईपलाईन घेण्यासाठी खोदलेल्या चरीबाबत कारवाई न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच स्विकारल्या प्रकरणी वणी (ता. दिंडोरी) येथे कार्यरत वन विभागातील त्रिमूर्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराने त्याच्या चिंचखेड गावातील शेतजमिनीचे बाजूस असलेल्या वनक्षेत्रातून पाण्याची पाईपलाईन घेण्यासाठी चरी खोदली होती.

त्याप्रकरणी तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी वन परिमंडल कार्यालयाकडून एक लाख रूपयांची लाच मागण्यात आली. तडजोडीअंती ही रक्कम पन्नास हजार इतकी ठरवण्यात आली.

तक्रारदाराच्या तक्रारीवरून सापळा रचण्यात येऊन वन परिमंडल अधिकारी अनिल चंद्रभान दळवी, वनरक्षक उस्मान गणी गणीमलंग सय्यद आणि वनरक्षक सुरेखा अश्रुबा खजे यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आला. या तिघांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com