वनसेवक हल्ला प्रकरण: तीन आरोपींची कारागृहात रवानगी

वनसेवक हल्ला प्रकरण: तीन आरोपींची कारागृहात रवानगी

ठाणापाडा । वार्ताहर | Thanpada-Dindori

वन कर्मचार्‍यांवर झालेल्या हल्ला प्रकरणी तीन आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. उंबरठाण (Umbarthan) वनपरिक्षेत्रात (Forest Range) रात्रीच्या सुमारास वन कर्मचारी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर गस्ती करीता चापावाडी जवळील उबरपाडा येथील फणसाचे माळ या जंगलात गस्तीवर असतांना माजी सरपंच लालजी टोपले हे खैराच्या लाकडाची तस्करी (Smuggling of Khair timber) स्वत:च्याच ट्रॅक्टर मध्ये खैर लाकडाची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.

त्यांना अडवले असता त्यांनी वन कर्मचारी (Forest Officers) यांच्याशी हुज्जत घातली. काहीजण अंधाराचा फायदा घेत गावात पळून गेले. सरपंच टोपले यांना वनविभागाने (Forest Department) मारझोड केली आहे असे समजताच काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वन कर्मचारी यांना बेदम मारहाण (Beating) केली यामध्ये वनरक्षक (Forest ranger) रामजी कुवर, हिरामण थविल, जेजीराम चौरे, अक्षय पाडवी हे गंभीर जखमी झाले होते. तर रामजी कुवर यास गावात घेऊन 2 तास ओलिस ठेवले होते.

याप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी लालजी टोपले हा या झटापटीत जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात (District Rural Hospital) दाखल करण्यात आले आहे. तर सावळीराम गावित, ज्ञानेश्वर गावित, कमलाकर चव्हाण या आरोपींना दिंडोरी सत्र न्यायालयात उभे केले असता जामीन नाकारण्यात आल्याने कोर्टाने या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून नाशिक (nashik) येथील मध्यवर्ती कारागृहात (Central Prison) रवानगी करण्यात आली आहे.

तालुक्यात घडलेली सदर घटना हि निंदनीय असून वृक्षप्रेमी नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आदिवासी पंचायत राज क्षेत्रात (पेसा) अंतर्गत वनविभागात स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढून जंगलाचे जतन व संवर्धन, रक्षण झाले पाहिजे या हेतूने स्थानिक युवकांना वनरक्षक पदावर नोकरी मिळाली आहे. आदिवासी मुलांना कृरपणे मारहाण करणार्‍यांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे. सरकारी कर्मचारी यांना तालुक्यात नेहमीच मारहाण केली जाते. त्यामुळे चांगले अधिकारी, कर्मचारी, नोकरदार आदिवासी भागात येण्यासाठी नाखूष असतात. परिणामी विकासाला खिळ बसते. या दहशतीला कोठेतरी आळा बसायला पाहिजे. म्हणून वनविभागाने या घटनेची सखोल चौकशी केली पाहिजे.

- हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार

Related Stories

No stories found.