किल्ले रामशेजवर वणवा; जंगल संपत्तीचे नुकसान

किल्ले रामशेजवर वणवा; जंगल संपत्तीचे नुकसान

ओझे | वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) किल्ले रामशेजवर ( Ramshej Fort ) काल सांयकाळी अज्ञात व्यक्ती आग लावण्यात आली असून या वणव्यामध्ये जंगलसंपत्ती तसेच जीवसृष्टीचे नुकसान झाल्याचे निसर्गप्रेमीच्या बोलण्यातून पुढे येते.

वणवा पेटल्यानंतर स्थनिक नागरिकांनी वनविभागाला ( Department of Forest ) त्वरित दुरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली त्यांनतर वनविभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मध्यरात्री पर्यत सहा ते सात तासाच्या अथांग परिश्रमानंतर व कड्याकपाऱ्यात शिरून वणवा विझविण्याचे काम चालू होते मात्र वाऱ्याचा वेग तसेच किल्ले रामशेजवर गवत जास्त प्रमाणात वाढलेले असल्यामुळे आग विझविण्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता मात्र मोठ्या कष्टानंतर वनविभागसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने लागलेला वणवा विझविण्यात यश आले व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

वनविभागाने सदर घटनेचा पंचनामा करून आज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. सदर किल्ले रामशेज वरील वणवा विझविण्यासाठी वनपाल अशोक काळे, श्रीमती योगिता खिरकाडे, वनसेवक शांताराम शिरसाठ,वनसेवक रघुनाथ शिगाडे तसेच स्थानिक नागरिक पंकज गायकवाड , संतोष चव्हाण, कुणाल जगताप, महेंद्र बोडके, अभिजित बोडके,भाऊसाहेब चोथे, विलास बगर, वाळू बगर तसेच आशेवाडी , तुंगलदरा येथील रहिवाशानी आदिनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com