मोखावणे डोंगरावर वणवा; जंगल संपत्तीचे नुकसान

आगीवर नियंत्रण
मोखावणे डोंगरावर वणवा; जंगल संपत्तीचे नुकसान

इगतपुरी | प्रतिनिधी Igatpuri

मोखावणे येथील डोंगरावर अचानक लागलेल्या महाकाय वनव्यात (Forest Fire on Mokhavane Mountain ) मोठ्या प्रमाणात वन संपदा नष्ट झाली आहे.

आज दुपारी 12 च्या सुमारास मोखावणे येथील डोंगराला अचानक आग(Forest Fire ) लागली अचानक लागलेली आग त्याच दरम्यान सुटलेला वारा या मुळे आगीचे प्रमाण वाढले व तब्बल एक किमी चा डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला वणवा लागल्याचे समजताच आपत्ती व्यवस्थापन टीम चे शाम धुमाळ , राकेश पाटील,महेंद्र माने यांनी सहकाऱ्या सोबत वणवा विझविण्या कामी धाव घेतली.

आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असताना काही जणांना आगी ची तीव्रता जाणवली या घटनेची तात्काळ वनविभागास माहिती देऊन त्यांची मदत बोलवली वनविभाग Department of Forest ,आपत्ती व्यवस्थापन (Disaster management ) टीम व वनकमिटी यांनी आटोकाट प्रयत्न करीत आग शांत केली.

परंतु धुरांचे लोट कायम होते त्यातच हवा आली की पुन्हा आग तयार होत होती. हे सर्व करीत असताना अनेक पाखरे जळून खाख झाल्याचे निदर्शनास आले तर काही पाखरे जखमी झाली जखमी होऊन पडलेल्या पाखरांना राकेश पाटील व महेंद्र माने यांनी त्यांना सुरक्षित स्थळी आणले तिथे त्यांना पाणी वैगरे पाजून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सुरक्षित ठेवले.

मात्र याचं दरम्यान अनेक ससे (चॉकलेटी रंगाचे) ,मुंगुस,आगी पासून बचाव व्हावा यासाठी सैर वैर पळत होते भीतीने व्याकुळ झालेल्या सश्यांना देखील सुरक्षित ठिकाणी सोडण्यात् आले.दरम्यान हा वणवा लागला की कोणी लावला याबाबत वनविभाग कसारा विहिगाव यांचे कडून तपास सुरु असला तरी या महाकाय वनव्या मुळे शेकडो पक्षी,पाखरे ,पक्ष्याची अंडी भस्मसात झाली असून साग,खैर,धावडा सारखी झाडें व वंन्औषधी नष्ट झाली आहेत..

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com