नाशिकपासून अवघ्या २० किमीवर पेटत आहेत वणवे; दरी-मनोलीत वनसंपत्ती धोक्यात

नाशिकपासून अवघ्या २० किमीवर पेटत आहेत वणवे; दरी-मनोलीत वनसंपत्ती धोक्यात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक तालुक्यातील (Nashik taluka dari villege) दरी गावच्या पश्चिम वनराईत (western forest area) मनोली-दरी बारीला (manoli dari baari) लागून असलेल्या आडी या डोंगरावर(Adi mountain) १० ते १५ हेक्टरवरील जंगल सम्पदेत वणवा लागला. माहिती मिळताच पर्यावरण मित्र तुषार पिंगळे, भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे यांनी तीन तास मोठया परिश्रमाने ओल्या बारदानाने वणवा विझवला....

दुर्मिळ झाडे (Rare trees), वनौषधीचे जंगल क्षेत्र (Forest area) वाचवल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यात १० ठिकाणी वणवा लागला. यात जैवविविधतेची मोठी हानी झाली; मात्र याबाबत ना- वणवा लावणारे गुन्हेगार पकडले,ना-वनव्यात नष्ट जैवविविधतेचे वास्तविक ऑडिट (Audit) केले असल्याची प्रतिक्रिया पर्यावरण मित्रांनी व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्यात दरवर्षी वनव्याच्या घटना घडतात,यंदा तर या वनव्याच्या घटना वाढल्या आहेत. ब्रम्हगिरी, घोटी मोरगड, हरसूल घाट, दोनदा रामशेज, मायना डोंगर, मातोरी गायरान, सुळका, पांजरपोळ, नाशिकरोड प्रेस, एचएएल परिसरातील ओसाड,व अन्य ठिकाणी वणवा लागल्याने कधी न भरून येईल इतके अपरिमित नुकसान झाले.

याबाबत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, वृक्षवल्ली फाउंडेशन,दरीमाता वृक्षमित्र परिवार यांनी पर्यावरण मंत्री, जिल्हा पोलिस अधिक्षक,वनविभाग याना पत्र दिले. वणवामुक्तीसाठी जनजागृती अभियान ही सुरू ठेवले आहेत.

जे काम वन पर्यावरण स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करायचे ते पर्यावरण मित्र करत आहेत. मात्र, याबाबत कुठलेही गांभीर्य पर्यावरण विभागास नाही. याबाबतीत समाज ही गप्पगार आहे. असेच एकूण चित्र असल्याने वणवा विजवण्यात मात्र फार कोणी पुढं येत नाही.

मात्र, वणवा विझवणारे निवडक पर्यावरण मित्र कसोटीने हे कार्य जीव धोक्यात टाकून करीत आहे. दरम्यान, काल (दि १७) दुपारी लागलेल्या वणव्यात दरीच्या आढि डोंगरावर दुर्मिळ झाडे वनऔषधी मुरुंगशेंग, कुडा, काटे सावर, अडुळसा, देशी निम अशी कित्येक वृक्ष, सरपटणारे प्राणी, जीव, पक्षी, त्यांची अंडी, पिले, घरटी आगीत भस्मसात झाली असल्याचे वृक्ष अभ्यासक तुषार पिंगळे यांनी सांगितले.

वणवा विजवण्यासाठी हातातली कामे सोडून दरीमाता वृक्षमित्र भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे, वृक्षवल्लीचे तुषार पिंगळे यांनी यशस्वीपणे वणवा विझवला.

पर्यावरणाचा एकूण त्याला लागून असलेल्या जैवविविधतेला वनव्या मुळे मोठा धोका पोहोचला आहे. दिवसागणिक मानवी दुष्टकृत्याने नष्ट होणारं जंगल, घाट, डोंगर, टेकडया, जैविविधता, वन्यजीव, प्राणी, पक्षी यामुळे सजीवसृष्टी धोक्यात सापडली आहे.

गारपीट, सुनामी, वाढलेली उष्णता, अवकाळी, वादळे हे याचेच द्योतक आहे. हे गंभीरपणे माणूस समजून का घेत नाही? हेच दुर्दैव आहे. केवळ नैसर्गिक संकटात ओरड करत बसनारे खूप झालेत,निसर्ग डोंगर टेकड्या वाचवण्यासाठी त्यांच्या संवर्धनासाठी मात्र फारसे कोणी पुढं येत नाही. वणवा लागल्यावर ही हाच अनुभव आहे.सांगा ना मग कशी वसुंधरा वाचेल?

राम खुर्दळ.(संस्थापक-शिवकार्य गडकोट,संवर्धन संस्था,तथा सदस्य-पर्यावरण टास्क फोर्स)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com