विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथील सुंदरबापू शिंदे या शेतकर्‍याच्या विहीरीत (Well) पडलेल्या बिबट्याला (Leopards) ग्रामस्थांच्या सहकार्याने विहीरीतून सुखरुप बाहेर काढण्यात वनविभागाला (Forest Department) यश आले...

शिकारीच्या शोधार्थ निघालेल्या बिबट्याला अंदाज न आल्याने सुंदरबापू शिदे यांच्या विहीरीत तो पडला. विहीरीच्या दिशेने कुत्रे सैरावैरा पळून भूंकत असल्याचे दिसल्याने शिंदे यांनी विहीरीत डोकावले. तेव्हा विहीरीत बिबट्या असल्याचे आढळून आले. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते अशोक भूसाळ व वनाधिकार्‍यांना घटनेची माहीती दिली.

घटनेची माहिती मिळताच वन क्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल पी. जे. पुंड, वनरक्षक एस. एम. पारधी, वाहन चालक बोर्‍हाडे, अशोक गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली व बिबट्याला सुखरुप बाहेर काढले. बिबट्या मादी जातीची असून अडीच ते तीन वर्षाची असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्या पकडताच पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com