द्वारका परिसरात बिबट्याचा थरार; दोन तासांच्या अथक प्रयत्नाअंती जाळ्यात

द्वारका परिसरात बिबट्याचा थरार; दोन तासांच्या अथक प्रयत्नाअंती जाळ्यात

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

मंगळवारी (दि. 22) रात्री अकरा वाजेच्या दरम्यान द्वारका भागातील पखाल रोड, आयेशानगर या भर वस्तीत मोकळ्या मैदानात बिबट्या (Leopard) दिसून आल्याने एकच खळबळ उडाली होती. काही क्षणातच परिसरात मोठी गर्दी झाली होती...

नागरिकांनी पोलीस तसेच वन विभागाला (Forest Department) माहिती दिल्यावर त्यांचे पथक या ठिकाणी आले. सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर परिसरातील तरुणांच्या सहकार्याने एका बंगल्यातून बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला.

आयेशानगर परिसरातील मोकळ्या मैदानात रात्री ११ वाजेच्या दरम्यान बिबट्या निदर्शनास आल्याने धावपळ उडाली होती. रात्री 1 वाजेच्या दरम्यान त्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. घटनेची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी दाखल झाले होते. रेस्क्यू करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मोठ्या प्रयत्नांनंतरही बिबट्या हाती लागत नव्हता.

द्वारका परिसरात बिबट्याचा थरार; दोन तासांच्या अथक प्रयत्नाअंती जाळ्यात
तारक मेहता फेम 'बबिता'चा अपघात

तसंच बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दीला दूर करणे कठीण झाले होते. लोकांच्या गोंधळामुळे बिबट्या घाबरून एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत जात होता.

बिबट्याच्या वावरामुळे महिला व लहान मुले घाबरलेल्या अवस्थेत होते. पोलीस व स्थानिक नागरिक यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आणि चारही बाजूने जाळ्या टाकून बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com