
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आज दुपारी चाडेगाव येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने अवघ्या अर्ध्या तासात सुखरूप बाहेर काढले आहे...
चाडेगाव येथील एका विहिरीत बिबट्या पडल्याचे गावकऱ्यांनी वनविभागाला कळवले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर दोरीच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. अवघ्या अर्ध्या तासात बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुखरूप बाहेर काढल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
ही मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले, राऊंड ऑफीसर अनिल अहिरराव, उत्तम पाटील, गोरे, ठाकरे, इको एको फाऊंडेशनचे अभिजित महाले आणि ऋत्विक पाटील यांनी राबवली.