अखेर 'तो' बिबट्या जेरबंद

अखेर 'तो' बिबट्या जेरबंद

सिन्नर | Sinnar

तालुक्यातील पूर्व भागात मेंढी (Mendhi), वडांगळी (wadangali), सोमठाणे (Somthane) आदी भागात बिबट्याच्या (Leopard) दहशतीखाली अनेक नागरिक वावरत होते. घराबाहेर निघण्यासाठी नागरिक धजावत नसल्याने बिबट्याचा (Leopard) बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत होती.

मेंढी शिवारात एका बिबट्याने दुचाकीवर हल्ला केल्याने शेतकरी जखमी झाले. त्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department) यश आले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी दहशत मात्र कायम आहे.

अखेर 'तो' बिबट्या जेरबंद
सचिन पिळगावकरांच्या लेकीचे बोल्ड फोटोशूट, चाहते घायाळ

गेल्या काही दिवसांपासून एक बिबट्या व त्याचे बछडे स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होते. दरम्यान मेंढी- वडांगळी रोडवरील सुधाकर गिते (Sudhakar Gite) यांच्या घरामागे वनविभागाने पिंजरा लावला होता.

अखेर 'तो' बिबट्या जेरबंद
राज्यात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?

या पिंजऱ्यात एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असले तरीही बिबट्यांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. या परिसरात पुन्हा वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com