
सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
सिन्नर तालुक्यातील चोंढी शिवारात दत्तात्र्येय कडभाने यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा (Leopard) वावर असल्याने चार दिवसांपूर्वी वनविभागाच्या (Forest) वतीने पिंजरा लावण्यात आला होता, आज त्या बिबट्याला (Leopard) पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.
त्या पिंजऱ्यात बिबट्याला आकर्षित करण्यासाठी सावज म्हणून कोंबडी ठेवली होती, दि. २१ रोजी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यातील कोंबडीला बघून त्या बिबट्याने पिंजऱ्याकडे धाव घेतली असता त्यात बिबट्या अडकला.
पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्या बिबट्याने मोठ्याने डरकाळ्या देत लोखंडी गजांना धडका द्यायला सुरुवात केली, बिबट्याचा आवाज येऊ लागल्याने परिसरातील शेतकरी दत्तात्र्येय कडभाने यांनी वनविभागाला कळविले.
पिंजऱ्याला धडका दिल्यामुळे हा बिबट्या रक्तभंबाळ झाल्याचे दिसून आले आहे. अशा अवस्थेत सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याला सिन्नरला हलविण्यात आले.