<p>हरसूल | Harsul</p><p>त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील बोकडभुजी ओहळात अंगणवाडी सेविकांनी दोन वनराई बंधारे बांधून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.</p> .<p>जलपरिषेच्या अभिनव उपक्रमाला दिवसेंदिवस सर्वच स्तरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यात लहान मोठ्यासहित विविध कर्मचारी सहभागी होत आहे. खरवळ येथील अंगणवाडी सेविकांचा या उपक्रमातील सहभाग इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.</p><p>यावेळी हरसूल येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी सागर वाघ, विस्तार अधिकारी संदीप चौधरी, पर्यवेक्षिका भारती भोये यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.</p>