परदेशातील विद्यार्थ्यांनी केला वेगवेगळ्या देशांत रुग्णांवर होणाऱ्या उपचार पद्धतीचा अभ्यास

परदेशातील विद्यार्थ्यांनी केला वेगवेगळ्या देशांत रुग्णांवर होणाऱ्या उपचार पद्धतीचा अभ्यास

नाशिक | Nashik

उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) सर्वात मोठया चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT Hospital) गेल्या २० दिवसांपासून विविध देशातील नऊ विद्यार्थी वेगवेगळ्या देशांत रुग्णांवर होत असलेल्या उपचार पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आले होते.

या विद्यार्थ्यांमध्ये ऍडम डूकोविच (स्लोव्हाकिया), अलिसा फर्नांडिज (स्पेन), ज्युलिया कोनाट (पोलंड), मॅरियम अल्बाना (बहारीन), नौर होश्याम इल्वाकील (इजिप्त), मार्ता पेरीज कॅब्रेरा (स्पेन), युरी सिल्वा (ब्राझील), ऍमा (इस्टोनिया) या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

विशेष म्हणजे, एसएमबीटी मेडिकल कॉलेजचे चार विद्यार्थी (Students) फ्रांस (France) इटली (Italy) आणि स्पेनमध्ये (Spain) नुकतेच जाऊन आले. यात आर्यमन सिंग आणि अथर्व देवकर हे फ्रांसमध्ये तर स्वराली खेडकर इटलीत आणि जान्हवी पारकर स्पेनमध्ये जून आणि जुलै महिन्यात जाऊन आल्या. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या देशात रुग्णांवर होत असलेल्या उपचार पद्धतींचा अभ्यास केला.

विद्यार्थ्यांना एका संशोधन प्रकल्पावर (Research Project) यादरम्यान काम करावे लागते. या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या संशोधनाच्या क्षेत्रात ज्ञान वाढविण्याची संधी मिळते. हा कार्यक्रम वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठांच्या माध्यमातून राबविला जातो.

एसएमबीटी मेडिकल कॉलेजमधील (SMBT Medical College) डॉ. श्याम अष्टेकर, डॉ. संजय जाधव, डॉ. नीरज मोरे, डॉ.किरण राजोळे, डॉ. लीना जैन या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले.

या संपूर्ण प्रकल्पाला एसएमबीटी मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता आणि एमएसएआय-एसएमबीटीच्या सचिव डॉ मीनल मोहगावकर (Dr. Meenal Mohgaonkar) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्प समन्वयक डॉ. मानसी पाध्येगुर्जर आणि एसएमबीटी-एमएसएआयचे विद्यार्थी प्रतिनिधी जान्हवी साबू, जतीन कुकरेजा, जान्हवी पारकर, जान्हवी वलियपरमबिल आणि अथर्व देवकर यांनी परिश्रम घेतले.

एसएमबीटीविषयी थोडेसे

एमएमबीटी हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) धामणगाव-घोटी खुर्द (Dhamangaon-Ghoti Khurd) याठिकाणी आहे.

रुग्णांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी याठिकाणी सेवेत आहेत. ८१० बेडचा आंतर रुग्ण विभाग, १०० आयसीयू बेड, १३ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, १० एनआयसीयू आणि पीआयसीयू बेड, २४ तास डायलिसीस, मेडिकल रक्तपेढी, रुग्णवाहिका सुविधा, रुग्णांची कुटुंबियांसाठी जेवण, राहण्याची सुविधा आदी एसएमबीटी हॉस्पिटलची वैशिष्ट्ये आहेत.

२० दिवसांत मेडिकल कॉलेजमधील दैनंदिन कामकाज पहिले. दररोज मोठ्या रुग्णांवर होणारे उपचार तसेच शस्रक्रीयांचा अनुभव घेता आला. विशेष म्हणजे, रुग्णांचे हॉस्पिटलसोबत असलेले नाते तसेच त्यांचा विश्वास हे किती महत्वाचे असते हे मी इथून घेऊन जाणार आहे.

मार्ता पेरिज कॅब्रेरा, स्पेन

आम्ही ऑपरेशन थियेटर मध्ये होतो. याच वेळी एका महिलेची प्रसूती झाली. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी जे काही घडलं ते मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद आणि डॉक्टरांकडून मिळालेली प्रेरणा अविस्मरणीय अशीच आहे.

ऍमा, इस्टोनिया

आमच्या देशात सर्जरी काचेतून पाहाव्या लागतात. इथे मात्र आम्ही त्या अगदी जवळून पहिल्या. यावेळी येथील प्रोफेसरांनी आम्हाला नीट समजावून सांगतिले जे शिक्षण इतर कुठेही नाही मिळाले ते इथून आम्ही घेऊन जात आहोत.

अलिसा फर्नांडिज, स्पेन

खरंच याठिकाणी येऊन मी भारावले आहे. येथील फूड कल्चर, संस्कृती आणि येथील वातावरणातील शिक्षण यामुळे वेगळीच ऊर्जा मिळाली. याठिकाणी घेतलेला प्रत्येक दिवशीचा अनुभव न विसरणारा असाच आहे. पुन्हा इथे येऊन शिक्षण घ्यायला आवडेल.

युरी सिल्वा, ब्राझील

एसएमबीटी मेडिकल कॉलेजमध्ये हा प्रकल्प २०२२ साली प्रथमच सुरु करण्यात आला. पहिल्याच वर्षी परदेशातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचा एसएमबीटीला भरघोस प्रतिसाद मिळाला. संपूर्ण देशात ज्या दोन संस्थांमध्ये रिसर्च एक्स्चेंजसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आले त्यातील एक एसएमबीटी मेडिकल कॉलेज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com