नाशिक : जिल्ह्यात बळजबरीने धर्मांतर करण्याचे उद्योग सुरु - चित्रा वाघ

नाशिक : जिल्ह्यात बळजबरीने धर्मांतर करण्याचे उद्योग सुरु - चित्रा वाघ

नाशिक | Nashik

बळजबरीने धर्मांतर (conversion) करण्याचे उद्योग नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सुरु असल्याचे सिन्नर (Sinnar) येथील एका महिलेवरील अत्याचार (Violence against women) प्रकरणावरुन पुन्हा एकदा सिध्द झाले असून त्याची पाळेमुळे शोधुन काढण्यासाठी शासन पातळीवरुन शेवटपर्यंत पाठपुरावा करावा लागेल, असे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटले आहे....

चित्रा वाघ (chitra wagh) नाशिक दौर्‍यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधुन सिन्नर येथील घटनेची माहीती दिली. गेल्या महीन्यात सिन्नर येथे एका महीलेचे बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी तिला डांबुन ठेवले.त्यानंतर तिला गोमांस (beef) शिजविण्यास सांगून . मुलांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यानंतर महीनाभर अत्याचार केल्याच्या घटनेची कहानी त्या महिलेने सांगितले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

ती पीडित महीला मुळची संगमनेरची असून लग्नानंतर मुंबईत स्थायिक झाली होती. तसेच लॉकडाऊन (Lockdown) काळात पतीची नोकरी गेल्यामुळे कामधंद्याच्या शोधात ते सिन्नर तालुक्यात माळेगाव व मुसळगाव परीसरात आले. त्यावेळी एका महीलेने संबधित तरुणीला नोकरीच्या अमिषाने नेऊन धर्मांतरासाठी तिला डांबून ठेवले.

नाशिक : जिल्ह्यात बळजबरीने धर्मांतर करण्याचे उद्योग सुरु - चित्रा वाघ
कंपनीला भीषण आग; दोन कामगार जखमी

त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाले. तिच्या पतीने मित्रांच्या सहाय्याने तिला सोडविले. या काळात ग्रामीण पोलिस अधी़क्षक उमाजी उमाप (Superintendent of Police Umaji Umap) यांनी चांगले सहकार्य केल्याने ती धर्मांतरापासून वाचली. मात्र असे प्रकार यापुर्वीही झाले असण्याची शक्यता आहे. म्हणून या गुन्हयाची (crime) पाळेमुळे शोधण्यासाठी आम्ही पोलिसांना साकडे घातले आहे.

राज्यात  शिंदे फडणवीस सरकारच्या काळात या अशा अनिष्ट प्रवृत्ती ठेचल्या जातीलच, त्यासाठी आम्हीही कटीबध्द आहोत. मात्र असे गैरप्रकार टाळण्यासाठी महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे व बळजबरीचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी कायदे आणखी कडक व त्याची अंमलबजावणी त्याच पध्दतीने कठोर होण्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत, असे वाघ यांनी स्पष्ट केले. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, संतोष नेरे आदींसह पिडीत महीलेचे कुटुंबीय उपस्थित होते.  

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com