
ओझे l विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) सध्या महावितरण (MSEDCL) कडून सक्तीची वीजबिल वसुली (Forced electricity bill collection) केली जात असून सध्या पिकाना भाव नसल्यामुळे बळीराजा (farmers) पुढे आर्थिक संकट उभे असताना
महावितरण कंपनीने केला ओल्या दुष्काळात तेरावा महिना असे म्हण्याची वेळ सध्या बळीराजावर आली आहे. सरकारने या सक्तीच्या वसुली संदर्भात त्वरित निर्णय घेवून सक्तीची वसुली थांबवावी आशी मागणी शेतकरी (farmers) वर्गकडून केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत तालुक्यात विक्रमी पाऊस (rain) होऊन अतिवृष्टी (heavy rain), महापूर (flood), ढगफुटी (cloudburst) यांमुळे शेतीतील सोयबीन, टोमॅटो ,वेलवर्णीय भाजीपाल्यासह सर्व पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी (crop damage) झाल्यामुळे सध्या शेतक-यांपुढे समस्याचा डोंगर उभा असताना महावितरण कंपनीने विज कनेक्शन (Electricity connection) कट करून बळीराजाला मोठा झटका दिला आहे.
तसेच तालुक्यात गेल्या तीन दिवसा पासून अतिरिक्त भारनियमन चालू झाले आहे सध्या तालुक्यात शेतीसाठी रात्री सात व दिवसा सात असा विजपुरवठा (power supply) केला जात आहे सर्व ठिकाणी एक तास भारनियमन वाढविले आहे त्यांमुळे शेतक-यांना पिकाना पुरेशे पाणी देता येत नाही. रात्री तर तालुक्यात बिबट्याचा (Leopard) धुमाकूळ असल्यामुळे शेतकरी (farmer) घराबाहेर पडणे मुश्किल झाले असताना
त्यात सध्या शेतक-याच्या पिकांना भाव नसताना महावितरण कंपनीने सक्तीच्या वीजबिल वसुलीचे (Electricity bill recovery) मोठे संकट बळीराजा पुढे उभे केले आहे आशा परिस्थिती मध्ये जगाच्या पोशिंदा असल्या बळी राजाला बायबाप सरकारने सक्तीची विजबिल वसुली थांबून न्याय दयावा आशी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.