मजुरांनी गावातच काम करण्याचा अजब फतवा

सक्ती करणार्‍यांवर पोलीस कारवाईची गरज; अंधश्रद्धा निर्मूलनचे निवेदन
मजुरांनी गावातच काम करण्याचा अजब फतवा
USER

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गावातच काम करावे, work in the village itself यासाठी कष्टकर्‍यांवर जिल्ह्यात अन्यायकारक सक्तीचे फतवे काढण्यात येत आहेत. असे अजब फतवे काढणार्‍यांवर पोलीस कारवाइची गरज असल्याचे साकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने Superstition Elimination Committee जिल्हा पोलीस अधीक्षकांना घातले आहे.

मालेगाव तालुक्यातील Malegaon Taluka तळवाडे Talwade & व सटाणा तालुक्यातील लखमापूर Satana Taluka- Lakhmapur येथे मजुरांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रकार ताजा असतांना आता निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे Khedlezhunge in Niphad taluka येथे मजुरांवर अन्याय करण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागात कांदे लागवडीचा हंगाम असल्याने मजुर मिळण्यास शेतकर्‍यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जिकडे जास्त मजुरी मिळेल त्या गावी मजूर कामासाठी जात आहे. ही बाब गावकर्‍यांना खटकत आहे. तालुक्यातील खेडलेझुंंगे येथील मजुरी करणार्‍या आदिवासी महिलांंना गावातच काम करण्याची त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना दमदाटी करण्यात येत आहे.

एका महिलेला तर एका व्यक्तीकडून पाण्यात विष मिसळण्याची धमकी देण्यात आली आहे. मजूर वाहतुकीचे काम करणार्‍या तामसवाडी येथील व्यक्तीवरही असाच दबाव टाकण्याचे प्रयत्न चालू आहे. मजुरास बाहेरच्या गावी वर्षभर काम मिळते , बांधावर पगार दिला जातो व तो त्यांच्या गावापेक्षा अधिक असतो म्हणून ते परवडेल त्या गावी काम करतात, असे मजुरांनी सांगितले आहे.

या बाबतीत प्रशासनाने लक्ष घालावे. तसेच दोषी व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, जिल्ह्यातील सरपंच, पोलीस पाटील, तंंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामसेवक यांची बैठक घेऊन,त्यांना कायद्याची समज द्यावी. निवेदनावर सरचिटणीस डॉ. टी.आर.गोकर्ण व सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांच्या सह्या आहेत.

मजूर गरीब असल्याने घाबरले आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यास गावचे सरपंच व पुढारी आपणास शासकीय सवलती मिळून देणार नाही अशी भीती त्यांनी बोलून दाखवली आहे. तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी .

कृष्णा चांदगुडे.सामाजिक कार्यकर्ते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com