चिंता वाढली! सलग तिसऱ्या दिवशी करोना रुग्णसंख्या शंभरीपार

चिंता वाढली! सलग तिसऱ्या दिवशी करोना रुग्णसंख्या शंभरीपार
करोना अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ११७ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर ६४ रूग्णांनी करोनावर मात केली...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ११७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरात (Nashik City) ७१, नाशिक ग्रामीण (Nashik Rural) विभागात ३६, मालेगाव (Malegaon) ०५ तर जिल्हाबाह्य ०५ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज एकही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ७५६ इतकी आहे.

Related Stories

No stories found.