काळजी घ्या! सलग दुसऱ्या दिवशी करोना रुग्णसंख्या हजारीपार

काळजी घ्या! सलग दुसऱ्या दिवशी करोना रुग्णसंख्या हजारीपार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १ हजार ५६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर १४१ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात १ हजार ५६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरात (Nashik City) ८२२, नाशिक ग्रामीण (Nashik Rural) विभागात १६९, मालेगाव (Malegaon) मनपा विभागात ०४ तर, जिल्हाबाह्य ६१ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज एकही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ७६३ इतकी आहे.

दरम्यान काल (दि. ०८) जिल्ह्यात १ हजार १०३ नवे करोनाबाधित आढळले होते. आज १ हजार ५६ नव्या रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी हजारांहून अधिक रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com