दोनशे नागरिकांसाठी ती बनली 'अन्नपूर्णा'

दोनशे नागरिकांसाठी ती बनली 'अन्नपूर्णा'

भगूरमध्ये प्रेरणा बलकवडे देतायेत मोफत भोजन

देवळाली कॅम्प | Deolali Camp

गेल्या वर्षभपासून करोनाचे संकट पाठ सोडण्यास तयार नसताना लॉकडाऊन मध्ये गोरगरिबांना भगूरमध्ये झेप भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रेरणा बलकवडे या वर्षांपासून दररोज दोनशेहून अधिक नागरिकांसाठी मोफत शिवभोजन थाळी देत आहे.

खऱ्या अर्थाने त्या या गरजवंतानसाठी अन्नपूर्णा बनल्या आहेत.

नाशिक तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मंहून प्रसिध्दी असलेले भगूर शहर हे ३५ गाव खेड्यांची बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गोरगरीब व मजुरांची उपस्थिती येथे दररोज असते, त्यांच्यासाठी काहीतरी करावे या हेतून जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व आपले सासरे ऍड. गोरखनाथ बलकवडे यांच्या प्रेरणेने गत वर्षी एप्रिल महिन्यात शिवभोजन केंद्र सुरु केले.

या केंद्रतून आजूबाजूला राहणाऱ्या गोरगरीब व मजुरांसाठी गेल्या वर्षभरापासून एकही रुपया न घेता सेवा देण्यात येत आहे. त्यासाठी येथील स्वा. सैनिक न.ल.बलकवडे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या जागेत भव्य किचन तयार केला आहे.

तसेच बसण्याची व्यवस्था देखील आहे. हे सर्व कामे दररोजचे जलद गतीने व्हावे यासाठी पिठाची गिरणी, पीठ मळण्याचे यंत्र आदींसह दररोज लागणारे दाळ, तांदुळासह गहू उपलब्ध करून ठेवले आहे. झेप भरारी फाऊंडेशनमार्फत दररोज दोनशेहुन अधिक नागरिकांना एक वेळचे भाजी, पोळी, वरण भात उपलब्ध करून देण्यासाठी येथील शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न आहे.

जेणेकरून गरजवंतांची भूख भागविली जाईल. यासाठी प्रेरणा बलकवडे यांना त्यांचे पती ऍड. विशाल बलकवडे यांची मोलाची साथ मिळत आहे. सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे त्यात आपण खारीचा वाटा उचलत असल्याचे प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले.

घरामध्ये एकटीच असल्याने व कामधंदाही व्यवस्थित नसल्याने परिस्थिती बिकट आहे. येथे मिळणारे जेवण चांगले असते. गेल्या वर्षभरापासून मोफत लाभ घेत आहे.

- हिराबाई थोरात, ग्राहक

गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज मी येथे भोजन घेण्यासाठी नियमित येतो. घरी एकटाच राहत असल्याने या थाळीचा मला लाभ होत आहे.

- गंगाधर कासार, ग्राहक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com