विविध मागण्यांसाठी शिक्षक आमदारांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी

विविध मागण्यांसाठी शिक्षक आमदारांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी

नाशिक । प्रतिनिधी |Nashik    

शिक्षण क्षेत्रातील (Education Field) समस्या राज्यात कोणतेही सरकार आले तरी सुटत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षक आमदार (Teacher MLA) रविवार दि.११ सप्टेंबरपासून पुणे ते मुंबई (Pune to Mumbai) पायी दिंडी काढून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार आहे...

पायी दिंडीचा मुलींची पहिली शाळा भिडे वाडा (Bhide Wada) दगडूशेठ हलवाई मंदिर (Dagdusheth Halwai Temple) समोर येथून होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे (Teacher MLA Kishore Darade) कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील (MLA Balaram Patil) अमरावती विभागाचे शिक्षक आमदार तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत (Dattatraya Sawant) या चार आमदारांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

शासन स्तरावर ३,९६९ शाळा, वर्ग व नैसर्गिक वाढीच्या तुकड्या आहे. या तुकड्यांवर २१,४२८ शिक्षक (Teacher)कार्यरत आहेत. या शिक्षकांना निधी सहित घोषित करून शंभर टक्के अनुदान द्यावे. तसेच त्रुटी पूर्तता केलेल्या शाळेचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करावा. विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शिक्षकांना (Granted Teacher) शासन निर्णय १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय लागू करून अनुदान द्यावे.

विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षणाचा शासन निर्णय निर्गमित करणे. ज्युनियर कॉलेजच्या वाढीव पदांना मान्यता देऊन अनुदान लागू करणे. याशिवाय १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना जुनी पेन्शन लागू करणे, अशा मागण्या या शिक्षकांनी केल्या आहेत.

तसेच या सर्व मागण्या शासनाने मान्य करून राज्यातील विनाअनुदानित शिक्षक हा शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक कायमचा पुसून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी प्रमुख मागणी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केली आहे. याशिवाय राज्य शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर पुढील काळात मोठ्या प्रमाणात शिक्षक जन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे शिक्षकांचे प्रश्न समजून घेऊन यामध्ये मार्ग काढतील असा आशावाद आमदार दराडे यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com