नाशिक सायकलिस्टकडून कोव्हिड सेंटरला अन्नधान्य‍ाची मदत

नाशिक सायकलिस्टकडून कोव्हिड सेंटरला अन्नधान्य‍ाची मदत

नाशिक । Nashik

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनकडून आयुर्वेद सेवा संघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रॉयल हेरिटेज येथे सुरु करण्यात आलेल्या 50 बेडच्या कोव्हीड सेंटरमधिल उपचार्थीसाठी अन्नधान्य वाटप करण्यात आले.

विलगीकरण हॉस्पिटल मध्ये दाखल झालेल्या करोना रुग्णांकरिता तसेच या रुग्णांची व्यवस्था व ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टर्स व स्वयंसेवक यांच्या नाष्टा व जेवणाची व्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती मार्फत केली जाते. त्यांच्या या उपक्रमास मदतीचा हातभार लागावा या अनुषंगाने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तर्फे 160 किलो गहू व तांदूळ,25 किलो साखर, 2 किलो चहा पावडर, 20 किलो तुरदाळ व 20 लिटर तेल देण्यात आले . राष्ट्रीय स्वयंस्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे अनिल चांदवडकर व आनंद यांच्याकडे हे सपूर्द करण्याय आले. याप्रसंगी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे,सचिव डॉ. मनिषा रौंदळ ,खजिनदार रवींद्र दुसाने, संचालक किशोर माने ,सुरेश डोंगरे व सभासद साधना दुसाने, भक्ती दुसाने व सतीश महाजन हे उपस्थित होते. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तर्फे सभासदांच्या वाढदिवसानिमित्त, कमीत कमी पाच किलो धान्य मदत स्वरूपात गरजूंना देण्याचे आवाहन केले जाते. या अनाजदान उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळतो व दर महिन्याला जमा झालेले धान्य हे गरजूंपर्यंत पोहचवण्याचं काम नाशिक सायकलिस्ट तर्फे गेल्या वर्षभरापासून केले जाते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com