सणासुदीच्या काळात ग्राहकांना सुरक्षित अन्नपदार्थ द्या!

सणासुदीच्या काळात ग्राहकांना सुरक्षित अन्नपदार्थ द्या!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पावसाळा आणि सध्याच्या सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे (food and drug administration) सह आयुक्त चंद्रशेखर साळुंके (Assistant Commissioner Chandrashekhar Salunke) यांच्याकडून करण्यात आले आहे. प्रशासनाची करडी नजर अशा विक्रेत्यांवर राहणार असून कडक कारवाई होणार असल्याचेही साळुंके यांनी स्पष्ट केले...

अन्न औषध प्रशासनातर्फे नाशिक कार्यालयात अन्न सुरक्षा सप्ताह (Food Safety week) आयोजित करण्यात आला असून, त्या अंतर्गत मिष्ठान्न उत्पादक, मिठाई विक्रेते व फरसाण उत्पादकासाठी मार्गदर्शक सूचना देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दोन सत्रांमध्ये झालेल्या कार्यशाळेत प्रत्येक सत्रात सुमारे 40 व्यावसायिक हजर होते.

कार्यशाळेचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त चंद्रशेखर साळुंके व सहायक आयुक्त गणेश परळीकर यांनी व्यवसायीकांना मार्गदर्शक सूचना देत नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले.

या कार्यशाळेत चित्रफितीद्वारे उत्पादक व मिठाई विक्रेते यांनी अन्नपदार्थाचा व्यवसाय करतांना घ्यावयाची काळजी व दक्षता तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा अंतर्गत असणार्‍या तरतुदींबाबत योगेश देशमुख व अमित रासकर यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी भगर असोसिएशन (Bhagar Association), नाशिकचे महेंद्र छोरीया (Mahendra Chhoria) व मिठाई उत्पादक विक्रेते संघटनेचे दिपक चौधरी (Deepak Chaudhari) व त्यांचे सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. या बैठकीला अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. सुर्यवंशी, संदिप देवरे, दि.ज्ञा.तांबोळी व अ.र.दाभाडे हे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com