Nashik News : अन्न व औषध प्रशासन विभागाची सप्तशृंगी गडावर दहा पेढे विक्रेत्यांवर कारवाई

Nashik News : अन्न व औषध प्रशासन विभागाची सप्तशृंगी गडावर दहा पेढे विक्रेत्यांवर कारवाई

सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptashrungi Gad

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असल्याने हजारो भाविक दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) येत असतात. मात्र, याच ठिकाणी नुकत्याच येणाऱ्या नवरात्रौउत्सवात भेसळयुक्त (Adulterated) पेढे (Pedha) रोखण्याचा दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने (Department of Food and Drug Administration) सप्तशृंगी गडावरील १० पेढे विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे...

Nashik News : अन्न व औषध प्रशासन विभागाची सप्तशृंगी गडावर दहा पेढे विक्रेत्यांवर कारवाई
Ajit Pawar : सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली 'ही' मोठी घोषणा

याबाबत अधिक माहिती अशी की, पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या (Navratri Festival) पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगीगड येथे लाखो भाविक (Devotee) यात्रा कालावधीत दर्शनासाठी येतात. यात्रेनिमित्त किंवा इतरवेळी भाविकांकडून प्रसाद म्हणून पेढे कलाकंद आदींची खरेदी केली जाते. त्याठिकाणी भेसळयुक्त पेढे व इतर पदार्थ खरेदी व विक्री केली जातात. त्यासाठी भेसळयुक्त पेढे व इतर पदार्थ रोखण्याचा दृष्टीने अन्न व औषध प्रशाशन विभागाने सप्तशृंगीगड येथे पेढे तपासणी मोहीम राबवली असता या मोहीमेत अक्षय रामचंद्र बाटे, कुंडलिक ईश्वर शिंगटे, रणजित नागनाथ सायकर, हनुमंत परशु यादव, केशव श्रीरंग खुने, गोरख हरी साळुंके, विठ्ठल रावसाहेब शिंदे, संदीप नारायण अडगळे, प्रल्हाद नामदेव गव्हाणे,  यांच्या दुकानांची तपासणी (Inspection of shops) करण्यात आली.

Nashik News : अन्न व औषध प्रशासन विभागाची सप्तशृंगी गडावर दहा पेढे विक्रेत्यांवर कारवाई
Nashik News : कांदा-टोमॅटो फेकत शेतकऱ्यांकडून अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; सरकारविरोधात घोषणाबाजी

त्यावेळी सदर ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ (Dairy products) विक्रीसाठी साठवल्याचे आढळून आले. मात्र, गुजरात (Gujrat) राज्यातून येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थाच्या पॉकेटवर एक्स्पायरी डेट लिहिलेली नव्हती. तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या स्वच्छतेविषयक बाबीचे उल्लंघन झालेले आढळून आले. या बाबींची पूर्तता करून सर्व पेढे विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या तरतुदीनुसार अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी सहआयुक्त संजय नारागुडे व सहाय्य्क आयुक्त (अन्न ) विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. तसेच भाविकांनी पेढे खरेदी करतांना स्वच्छता असलेल्या ठिकाणाहून खरेदी करावे. शिळे अन्नपदार्थ खरेदी करू नये असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Nashik News : अन्न व औषध प्रशासन विभागाची सप्तशृंगी गडावर दहा पेढे विक्रेत्यांवर कारवाई
Nashik News : अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो गायब

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईचे भाविक व नागरिकांचा वतीने स्वागत करण्यात येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) याठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने गुजरात राज्यातून येणाऱ्या भेसळयुक्त पेढ्यांसंदर्भात कारवाई केली होती. त्यानंतर दुसरी कारवाई सप्तशृंगीगड येथे करण्यात आली. मात्र, हा एक्स्पायरी डेट नसणारा भेसळयुक्त पेढा गुजरात राज्यातून महाराष्ट्रात कसा पोहच केला जातो व महाराष्ट्रात कोण होलसेल करून नागरिकांच्या जीवाशी खेळतो आहे, अशा दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : अन्न व औषध प्रशासन विभागाची सप्तशृंगी गडावर दहा पेढे विक्रेत्यांवर कारवाई
Nashik News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com