नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

आ. सुहास कांदे
नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे ( Heavy Rain ) सर्वसामान्य जनतेसह शेतकर्‍यांची अतोनात हानी झाली आहे. अनेकांचे संसार या संकटामुळे उघड्यावर पडले आहेत. हातात आलेले पिक वाया गेल्याने ( crop damages )मोठे आर्थिक संकट शेतकरी बांधवांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे शासन पातळीवरून जास्तीतजास्त मदत मिळवून देत दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याची ग्वाही नांदगावचे आ. सुहास कांदे ( MLA Suhas Kande ) यांनी येथे दिली.

मालेगाव तालुक्यातील ( Malegaon Taluka ) साकुरी, निंबायती,जेवूर, जाटपाडे व निमगाव या गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासकीय अधिकार्‍यांसमवेत आज नांदगाव मतदार संघाचे आ. सुहास कांदे यांनी पाहणी केली. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे हातातले पिक वाया गेल्याची व्यथा शेतकर्‍यांतर्फे यावेळी मांडण्यात आली. आपद्ग्रस्त शेतकर्‍यांचे सांत्वन करत आ. कांदे यांनी जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करणार (Follow up with the government ) असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना निमगाव, कळवाडी व सौंदाणे जिल्हा परिषद गटात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव मदतीसाठी शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सग्राम बच्छाव, महेंद्र दुकळे, धनजय कादे,पकज निकम,सुरेश शेलार, महेंद्र पवार, रोहित जाधव, यशवत देसले,वैभव साळुखे, मुन्ना पवार, आबा देवरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com