आपद्ग्रस्तांना मदतीसाठी पाठपुरावा

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
आपद्ग्रस्तांना मदतीसाठी पाठपुरावा

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

शहरासह तालुक्यात अतीवृष्टीमुळे (Heavy rain) तसेच लेंडी व शाकंबरी नद्यांना आलेल्या महापुरामुळे सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी कोट्यवधी रूपयांची वित्तहानी (Financial loss) झाली आहे. पिकांसह अनेक दुकाने व घरे वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे.

यंत्रणेतर्फे नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करत आपद्ग्रस्तांना त्वरीत मदत मिळावी यास्तव जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी येथे बोलतांना दिली.

अतीवृष्टीमुळे लेंडी व शाकंबरी नदीला आलेल्या महापुरामुळे शहरातील अनेक दुकाने, घरे वाहून गेली कोट्यवधी रूपयांची वित्तहानी झाली आहे. गोरगरीबांची घरेच संसारोपयोगी साहित्यासह वाहून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

या नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भेट देऊन पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणुन घेत दिलासा दिला. आपद्ग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यासह सरकारी अधिकार्‍यांची बैठक घेत तात्काळ मदत करण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना केल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. पवार यांच्यासमोर बेघर झालेल्या नागरिकांनी प्रशासन विरोधात समस्यांचा पाढाच वाचला असता नक्कीच कारवाई करू असे आश्वासन त्यांनी दिले. शहरातील गुलजारवाडी व दहेगाव नाका या भागातील नागरिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

या भागाची पाहणी करतांना ना.डॉ. पवार यांनी आपद्ग्रस्त महिलांना धीर देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगून दिलासा दिला. जिल्हाधिकारी व आपत्ती तहसीलदार व्यवस्थापन समितीच्या (Disaster Tehsildar Management Committee) अधिकार्‍यांशी बैठक घेत सर्व विस्थापित नागरिकांना तात्काळ निवारा व भोजनाचीव्यवस्था करून देण्याच्या सूचना डॉ. पवार यांनी केल्या.

धरण फुटल्याची अफवा!

ना.डॉ. भारती पवार मस्तानी अम्मा दर्गा भागात पाहणी करत असतांनाच कोणीतरी हेतपुरस्पर धरण (Dam) फुटले असुन अचानकपणे पाणी वाढल्याची अफवा पसरवली. यावेळी एकच धावपळ होऊन नागरिक रस्त्यावर इकडे-तिकडे पळू लागले. शेवटी पोलिसांनी असे काहीही झाले नसून कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com