वाहतुकीच्या नियमांचे पालन करा; सिटीलिंक चालकांना पोलिसांचे आवाहन

वाहतुकीच्या नियमांचे पालन करा; सिटीलिंक चालकांना पोलिसांचे आवाहन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिटीलिंक (Citylink) व प्रवाशांचे नाते अधिक दृढ होण्यासाठी तसेच प्रवाशांना अधिक सुरक्षितरित्या व सुखकर प्रवास (safe and pleasant journey) करता यावा, यासाठी सिटीलिंककडून चालक व वाहकांसाठी प्रत्येक रविवारी मार्गदर्शन शिबिराचे (Guidance camp) आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिटीलिंक (Citylink), पोलिस प्रशासन (Police Administration) व नाशिक फस्ट (Nashik First) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा पहिला टप्पा पूर्ण झाले असून दर रविवारी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सिटीलिंक मुख्यालयात (Citylink Headquarter) मार्गदर्शन शिबीर पार पडले.

दोन सत्रात झालेल्या शिबिराच्या पहिल्या सत्रात मोटिव्हेशनल ट्रेनर (Motivational Trainer) व द आर्ट ऑफ सक्सेसचे संचालक अभय बाग यांनी चालकांना ट्राफिक अवेअरनेस (Traffic Awareness) व पर्सनालिटी डेव्हलपमेंट (Personality Development) या विषयावर मार्गदर्शन केले.

यामध्ये बस चालविताना चालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, चालकांची प्रवासी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांप्रती असलेली जबाबदारी, प्रवाशांसोबत असलेले सकारात्मक वर्तन, प्रवाशांसोबत संभाषण करतांना मनावर संयम ठेवण्याबरोबरच आपली बस स्वच्छ ठेवणे, फेरी सुरू करण्यापूर्वी बसचे पार्ट तपासून घेणे अशा अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.

तर दुसर्‍या सत्रात वाहतूक शाखा युनिट २ (Transport Branch Unit 2) चे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब शेळके (Sub-Inspector of Police Bhausaheb Shelke) यांनी चालकांना मार्गदर्शन केले.

यावेळी शेळके यांनी वाहतुकीचे नियम (Traffic rules) समजावून सांगताना वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आर टी ओ नियमांचे (RTO rules) पालन करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे हे प्रत्येक चालकाची जबाबदारी असल्याचे शेळके यांनी संगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com