नियम पाळा अन्यथा कारवाई

नियम पाळा अन्यथा कारवाई

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरात पश्चिम भागासह ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनासह सर्व नागरिकांनी सतर्क रहावे लागेल.

Last updated

आरोग्य यंत्रणेच्या नियमाचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा कृषीमंत्री दादा भुसे यांनी येथे बोलतांना दिला.शहरातील पश्चिम भागासह तालुक्यातील दाभाडी, वडेल, झोडगे आदी गावांमध्ये बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी मनपा, आरोग्य यंत्रणेसह विविध विभागांतर्फे होत असलेल्या उपाययोजनांचा आढावा कृषिमंत्री भुसे यांनी घेतला. आरोग्य यंत्रणेच्या सुचनांकडे नागरीकांतर्फे दुर्लक्ष होत असल्याने संक्रमण वाढत असल्याचे स्पष्ट झाल्याने ना. भुसे यांनी वरील इशारा दिला.

अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, मनपा उपायुक्त नितीन कापडणीस, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, पो. उपअधिक्षक शशिकांत शिंदे, डॉ. हितेश महाले, डॉ. सपना ठाकरे, डॉ. शैलेश निकम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

बाधीत रूग्णांसाठी एमएसजी कॉलेजमधील कोवीड सेंटर कार्यान्वित ठेवण्यात यावे. औषधांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता मनपाने घ्यावी रुग्णांना गृहविलगीकरणाची मुभा देतांना आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावे, असे स्पष्ट करत भुसे पुढे म्हणाले,

Last updated

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com