निर्बंधाची अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी

निर्बंधाची अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासनाने नवे निर्बंध लागू (New restrictions) केले आहेत. त्यानुसार दिवसा जमावबंदी (Curfew) आणि रात्री संचारबंदी (Night curfew) असेल. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत हे निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी दिले आहेत.

नाशिकमध्ये (nashik) आता दिवसाला 1 हजार करोना (corona) रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन कामाला लागले आहे. येणार्या काळात लसीकरणाला (vaccination) गती देण्याचे प्रयत्नही होणार आहेत. राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. ते जसेच्या तसे लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. त्यानुसार दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू असेल.

खासगी कार्यालये (Private offices) आणि विविध आस्थापनांमध्ये 50 टक्के उपस्थिती असेल. प्रवासी वाहतुकीवर सध्यातरी कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. सुरक्षित अंतर पाळावे, नागरिकांनी मास्क (mask) घालावा, करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

रामकुंड परिसरात अलोट गर्दी

जिल्हा प्रशासनाने एकीकडे नवे निर्बंध लागू केले आहेत. मात्र रामकुंड परिसरात (Ramkund area) तुफान गर्दी (crowd) पाहायला मिळत आहे. नागरिकांनी करोनाचे सारे नियम धाब्यावर बसवले आहेत. सुरक्षित अंतराचे पालन बासनात गुंडाळून ठेवले आहे.

बहुतांश जणांच्या चेहर्यावर मास्क (mask) दिसत नाहीत. त्यामुळे वायू वेगाने पसरणार्या ओमिक्रॉनला कसे रोखणार? असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. प्रशासनाने इतक्या नागरिकांवर कारवाई करावी तरी कशी? हाही प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून नियम पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com