लोककला जपणारे लोककलावंत उपेक्षित

यावर्षी एकही कार्यक्रम नाही; अनेकांवर उपासमारीची वेळ
लोककला जपणारे लोककलावंत उपेक्षित

नाशिक । गोकुळ पवार Nashik

लोककलांचा पारंपरिक वारसा ( Traditional heritage of folk art ) जपणारे अनेक लोक कलावंत आपल्या अवतीभवती आहेत. यंदा लॉकडाऊनच्या काळात इतराप्रमाणेच लोक कलावंत मंडळीचा देखील दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहिला आहे. करोनामुळे ( Due to Corona ) सलग दुसर्‍या वर्षीही लोककलावंत अडचणीत सापडले आहेत. कार्यक्रम बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात अनेक लोककलावंत लोककलेचा वारसा जपत आहे. दशावतार, बोहाडा, कलगीतुरा, तमाशा, भारुड, लावणी-जागरण, मानवी वाघ,शिमग्याच सोंग आदी लोककला जिल्ह्यातील त्र्यंबक, हरसूल, सुरगाणा, पेठ आदी भागात सादर केल्या जातात. परंतु कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून सांस्कृतिक, सार्वजनिक तसेच घरगुती कर्यक्रम बंद असल्याने सुपार्‍या मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे या लोककलावंतावर आर्थिक संकटासह उपासमारीची वेळ आली आहे.

आदिवासी भागात या लोककलांना विशेष महत्त्व आहे. पिढ्यान्पिढ्या या लोककला हे लोककलावंत जपत आलेले आहेत. कधी एक तर कधी अनेक कलाकारांचा गत या लोककला, लोकनृत्य, लोकवाद्य सादर करत आहेत. त्यामुळे या लोककला प्रसिध्द आहेत. गावच्या यात्रा, जत्रांसाठी, घरगुती कार्यक्रमांसाठी किंवा तालुका जिल्हास्तरांवर विविध स्पर्धांमध्ये या लोककला सादर केल्या जातात. या माध्यमातून सामाजिक प्रबोधन मनोरंजन केले जाते. मात्र यंदा करोनामुळे कार्यक्रमांची सुपारीच मिळत नसल्याने लोक कलेवर अवलंबून असणार्‍या लोककलावंत धास्तावले आहेत.

लोककला जपणारे आर्थिक संकटात

बोहाडा, कलगीतुरा, गोंधळी आणि इतर कार्यक्रमात मानधनावर काम करणार्‍या कलावंताना सध्या कार्यक्रम मिळणेच बंद झाल्याने कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागातून अनेक कलाकार शहरात येऊन कार्यक्रम करतात. परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने कार्यक्रमही बंद आहेत. हे कलाकार लोककलेची जपणूक करत आहेत. परंतु कार्यक्रम बंद असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

लोककला जोपासणे गरजेचे

गेल्या वर्षा दीड वर्षांपासून कार्यक्रम बंद असल्याने लोककलेवर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारा इतर रोजगारावर आपली उपजीविका भागवत आहेत. परंतु अशाने कर्यक्रम होत नसून लोककला मागे पडण्याची भीती आहे. कार्यक्रमच होत नसल्याने कलाकारांना या लोककला पुढच्या पिढीकडे सोपवायला देखील अडचण येत आहे. त्यामुळे लोककला नामशेष तर होणार नाही ना? असा प्रश्न सध्या हे कलाकर विचारत आहेत. म्हणून कार्यक्रमांना परवानगी देऊन या लोककला जपायला हव्यात त्यासाठी हे लोककलावंत जगले पाहिजेत.

आमच्या पिढ्यान्पिढ्या लोककला करत आहेत. परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कार्यक्रमच बंद झाले. तशी आमच्यासकट कुटुंबाची उपासमार सुरू झाली. आम्ही काही गावकरी मिळून बोहाडा, कलगीतुरा आदी कार्यक्रम करत असतो. मात्र यावर्षी एकही कार्यक्रम न मिळाल्याने, समुहातील कलाकार निराश झाले आहेत. काहींनी दुसरा रोजगार शोधण्यास सुरूवात केली असून अनेक कलाकारांच्या हाताला काहीच काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

नारायण लहाडे, लोककलावंत बर्डापाडा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com