नाशिकवर धुक्याची दुलई; बदलेल्या वातावरणामुळे व्यायामप्रेमी घराबाहेर

नाशिकवर धुक्याची दुलई; बदलेल्या वातावरणामुळे व्यायामप्रेमी घराबाहेर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात (Nashik City) आज धुक्याची दुलई पसरली होती. (Fog in the City) पाऊस थांबल्यानंतर अनोख्या वातावरणाचा अनुभव आज नाशिककरांनी घेतला. वातावरणातील बदलामुळे सकाळी साडेसात वाजले तरीही अनेक वाहनांनी दिवे सुरु करूनच वाहने पुढे चालवली...

दाट धुक्यात शहरातील उद्याने फुलली होती. (Gardens houseful in the city) बळी मंदिर (bali temple area) परिसरातील प्रमोद महाजन उद्यान (Pramod Mahajan udyan), नव्याने उद्घाटन झालेले थीम पार्क (Theme Park), गोल्फ क्लब मैदानावर (Golf Club Ground) अनेकांनी क्रिकेटचा आनंद घेत पडलेल्या धुक्यात फोटोसेशन केले.

पायी भ्रमंतीसाठी जाणाऱ्या नागरिकांना भल्या पहाटे सुखद धक्का बसला. सर्वत्र दाट धुक्याचे आच्छादन पसरले होते. काही अंतराच्या पलीकडे काय आहे हे देखील दिसेनासे झाले.

पहाटेपासून दाटलेले हे धुके सकाळी आठ वाजेपर्यंत अनुभवता आले. त्याची माहिती कर्णोपकर्णी पसरल्याने बहुतेकांनी सकाळी लवकर उठून त्याचे दर्शन घेतले. गोदावरी पात्रावर (Godavri river) त्याचे प्रमाण अधिक होते. नदीच्या एका तिरावरून दुसऱ्या तिरावरील काहीही दृष्टीपथास पडत नव्हते. दाट धुक्यामुळे रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांना दिवे लावून मार्गक्रमण करावे लागले.

आज नाशिकमधील तपमान चांगलेच वाढलेले आहे. आज सकाळी प्राप्त माहितीनुसार नाशिकमधील किमान तापमान (Temperature in the nashik) 22.4 अंश सेल्सियस होते. तर, कमाल तपमान ३२.२ अंश सेल्सियस होते. ऑक्टोबर हिटचा (October hit) परिणाम जाणवत नसला तरीदेखील आता पाऊस जाऊन कडक ऊन पडू लागल्याने उन्हाने काहिली होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.