जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा वीज पडल्याने जळून खाक

जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा वीज पडल्याने  जळून खाक

दहिवड | वार्ताहर | Dahiwad

देवळा तालुक्यातील (Deola Taluka) रामनगर दहिवड परिसरात (Dahiwad Area) सोमवार (दि.१०) रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. त्यात येथील एका शेतकऱ्याच्या (Farmer) शेतात जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा वीज पडल्याने जळून खाक झाला आहे...

जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा वीज पडल्याने  जळून खाक
राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

याबाबत अधिक माहिती अशी की, रामनगर (Ramnagar) येथील शेतकरी शिवाजी शामा मोरे यांनी त्यांच्या शेतात जनावरांसाठी साधारण पाच ते सहा ट्रॅक्टर चारा राखून ठेवला होता. मात्र, काल विजांच्या कडकडाटासह (Lightning Strikes) जोरदार पाऊस झाल्याने सदर चाऱ्यावर अचानकपणे वीज कोसळून संपूर्ण चारा आगीत भस्मसात झाला.

जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा वीज पडल्याने  जळून खाक
अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून बैलाचा मृत्यू, शेतीचेही नुकसान

दरम्यान, सदर चाऱ्याला आग लागल्याचे समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र, मोठ्या प्रमाणावर हवा चालू असल्यामुळे आगीने (Fire) रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे संपूर्ण चारा जळून खाक झाल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. तसेच शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com