
सिन्नर | प्रतिनिधी Sinnar
तालुक्यातील दुसंगवाडी शिवारातील दगडू ढमाळे यांनी आपल्या शेतात जनावरांच्या चार्यासाठी काढणी करुन ठेवलेला सोयाबीनचा भुसा वीज पडून आग लागल्याने खाक झाला.
आग लागली तेव्हा परिसरात वादळ सुरु असल्याने आग विझवण्यासाठी कोणालाही पुढाकार घेता आला नाही. बराच वेळानंतर सिन्नर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत चारा पुर्णत: जळून खाक झाला होता.